देवरुखात अभिनय संस्कार शिबिर उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरुखात अभिनय संस्कार शिबिर उदघाटन
देवरुखात अभिनय संस्कार शिबिर उदघाटन

देवरुखात अभिनय संस्कार शिबिर उदघाटन

sakal_logo
By

rat१p१६.jpg
25855
देवरूखः एसटी ७५ वर्षे झाल्याबद्दल देवरूख आगारात गाडी सजवून कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
--------------
देवरूख एसटी आगारात
एसटीचा वाढदिवस साजरा
साडवली ः महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने ७५व्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने देवरूख एसटी आगारात गाडी सजवून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक व प्रवाशी राजाराम गर्दे यांनी केक कापला. या वेळी आगारप्रमुख राजेश पाथरे, वाहतूक नियंत्रक स्वप्नील शिंदे, कार्यशाळा निरीक्षक मलुष्टे, एसटी प्रेमी मित्रमंडळाचे निखिल कोळवणकर, योगेश फाटक तसेच चालक, वाहक, यांत्रिकी विभाग कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते. या वेळी राजेश पाथरे यांनी एसटीचा ७४ वर्षाचा इतिहास कथन करताना १ जून १९४८ ला पुणे ते अहमदनगर मार्गावर पहिली बस धावली. याच मार्गावर आज बॅटरीवरील धावलेली बस याचा आढावा घेतला. आता बससेवेत चांगल्या सुधारणा झाल्या असून, प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीने चांगल्या सोयी पुरवल्या आहेत. प्रवाशांनी एसटीला चांगले सहकार्य केले आहे. देवरूख आगारातून आता मागणीनुसार लांब पल्ल्याच्या बसफेर्‍या सुरू केल्या आहेत असे सांगितले. या वेळी उपस्थितांनी मनोगतात एसटी सेवेबाबत समाधान व्यक्त केले.
---------------
देवरुखात अभिनय संस्कार शिबिर उदघाटन
साडवली ः कोकण मराठी साहित्य परिषद शाखा देवरूख युवाशक्ती विभागाच्यावतीने आयोजित अभिनय संस्कार शिबिराचे उदघाटन झाले. दोन दिवस हे शिबिर होणार आहे. शिबिराचे उद्घाटन अभिनेते-दिग्दर्शक असित रेडीज यांच्या हस्ते झाले. देवरूख खालची आळी येथील नक्षत्र सभागृहात हे शिबिर गुरुवारपर्यंत (ता. २) सुरू राहणार आहे. उद्घाटनप्रसंगी दिग्दर्शक डॉ. शशांक पाटील, अभिनेते डॉ. भगवान नारकर, प्रभाकर डाऊल, विनय होडे, देवरूख शाखेचे अध्यक्ष दीपक लिंगायत, सचिव प्रमोद हर्डीकर, युवाशक्ती प्रमुख शिवम लिंगायत, प्रशंसा डाऊल तसेच मनोज गोखले, रेवा कदम, समीर मोहिते, प्रशांत काबदुले, अभिमन्यू शिंदे, वैभव बुर्शे ,प्रकाश घस्ते आदी उपस्थित होते. तरुण पिढीला अभिनय क्षेत्राची गोडी लागावी, अभिनयातील बारकावे समजावेत, नवीन कलाकार घडावेत या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्ह्यातील २० जणांनी सहभाग नोंदवला आहे.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63764 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top