गवळी, बोडेकर यांना ‘कोमसाप’चे पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गवळी, बोडेकर यांना ‘कोमसाप’चे पुरस्कार जाहीर
गवळी, बोडेकर यांना ‘कोमसाप’चे पुरस्कार जाहीर

गवळी, बोडेकर यांना ‘कोमसाप’चे पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

25872
नामदेव गवळी, चेतन बोडेकर

गवळी, बोडेकरांना पुरस्कार
वैभववाडी ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणारा वसंत सावंत पुरस्कार येथील कवी नामदेव गवळी आणि कवी चेतन बोडेकर यांना जाहीर झाला आहे. पालघर येथे होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. ‘कोमसाप’मार्फत कथा आणि काव्यसंग्रहासाठी पुरस्कार दिले जातात. यावर्षी २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ या तीन वर्षाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. २०१८-१९ चा वसंत सावंत स्मृती पुरस्कार येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक कवी नामदेव गवळी यांना जाहीर झाला आहे. श्री. गवळी यांचा मालवणी भाषेतील ‘भातालय’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून यातील काही कवितांचा पाठ्यपुस्तकात समावेश झाला आहे. याशिवाय २०२०-२१ चा वसंत सावंत स्मृती पुरस्कार शिक्षक कवी चेतन बोडेकर यांना जाहीर झाला आहे. श्री. बोडेकर यांचा ‘गावय’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. वैभववाडी तालुक्यातील श्री. गवळी आणि श्री. बोडेकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. या दोघांचेही ‘कोमसाप’चे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, मालवणचे तालुकाध्यक्ष सुरेश ठाकुर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63786 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top