
चिरे कापताना जखमी झालेल्याचा मृत्यू
चिरे कापताना जखमी झालेल्याचा मृत्यू
रत्नागिरी ः चवे येथे चिरे कापण्याच्या मशीनने पाय कापलेल्या कामगाराचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रवी बापू जाधव (वय ३५, मुळ ः सोलापूर सध्या रा. चवेफाटा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना २९ मे रोजी चवेफाटा येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चवे येथील चिरेखाणीवर मशीन चालवणारा ऑपरेटर विनोद शिंदे फोनवर बोलत असताना मयत रवी जाधव याने बंद मशीन सुरू केले. त्याला मशीन चालवता येत नव्हते. मशीन सुरू होताच रवी मशीनसोबत उडाला आणि त्याचा पाय कापला गेला. तत्काळ त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.
------
चिरेखाण मॅनेजरला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील निरुळ येथे चिरेखाण मॅनेजरला शिवीगाळ व मारहाण करून लोखंडी रॉडने मारणाऱ्या तीन संशयितांविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गुंड्या तुकाराम खिल्लारी, युवराज बाळू जाधव, अप्पु तुकाराम खिल्लारी (सर्व रा. निरुळ फाटा, चिरेखाणवर जि. रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना ३० मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास निरुळ येथील साळवी यांच्या चिरेखाण -धोपटवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवास विद्याधर मलमे (वय ४०, रा. निरुळ-धोपटवाडी मुळ ः फणसोप मराठवाडी, रत्नागिरी) हे संतोष साळवी राहणार फणसोप यांच्या निरुळ फाटा येथील चिरखाणीवर मॅनेजर म्हणून कामाला आहेत. ते तेथेच झोपडी बांधून कुटुंबासहित राहात होते. सोमवारी संशयित तेथे आले व या खाणीवर मॅनेजर कोण आहे, अशी चौकशी केली. त्या वेळी मलमे यांनी मी मॅनेजर आहे असे सांगितले. संशयितांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर संशयित गुंड्या खिल्लारी याने अप्पु खिल्लारी यास फोनवरून मोटार घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर तिघांनीही मलमे यांना मारहाण केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63793 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..