
रस्सीखेच स्पर्धेत पंजाब विजेता
25900
शिरोडा ः विजेत्या पंजाब संघासोबत मान्यवर.
रस्सीखेच स्पर्धेत पंजाब विजेता
शिरोड्यातील स्पर्धा; महिलांमध्ये केरळ संघाची बाजी
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १ ः टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व शिरोडा वेळागर सर्व्हे नं. ३९ मित्रमंडळाच्या सहकार्याने महाराष्ट्र टग ऑफ वॉर सिंधुदुर्गने शिरोडा-वेळागर बीचवर आयोजित केलेल्या ३५ व्या सिनियर नॅशनल टग ऑफ वॉर बीच रस्सीखेच २०२२ स्पर्धेत अंतिम सामन्यात पुरुष गटातून पंजाब संघाने गुजरातवर मात करीत सुवर्ण पदक पटकावले. तर महिलांमध्ये केरळ संघ हरियाणा संघावर मात करीत विजेता ठरला.
या स्पर्धेत १८ राज्यातील ४३ संघातील ६६० खेळाडूंनी सहभाग घेतला. सोमवारी पार डलेल्या अंतिम सामन्यात पुरुष संघ ५६० किलो वजनी गटात पंजाब संघाने सुवर्ण, गुजरातने रौप्य, तर अरुणाचल प्रदेशने कांस्यपदक पटकावले. पुरुष संघ ५८० किलो वजनी गटात पंजाब संघाने सुवर्ण, केरळ संघाने रौप्य, तर हरियाणाने कांस्यपदक पटकावले. महिला ४८० किलो वजनी गटात केरळने सुवर्ण, हरियाणा पॉवर संघाने रौप्य, तर गुजरात संघाने कांस्यपदक पटाविले. पुरुष व महिला मिक्स ६०० किलो वजनी गटात पंजाब संघाने सुवर्ण, हरियाणा संघाने रौप्य, तर गुजरात संघाने कांस्यपदक पटकावले.
राष्ट्रीय रस्सीखेच संघटनेचे सचिव मदन मोहन, महाराट्र राज्य रस्सीखेच्या अध्यक्षा व आशियाई रस्सीखेच्या सचिव माधवी पाटील, राज्य सचिव श्री. गुपिले, संयोजक व जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष तथा वेळागर सर्व्हे नं. ३९ चे नेते जयप्रकाश चमणकर, ट्रेनिंग हेड एन. के. चक्रवर्ती, निर्णय समितीप्रमुख प्रमोद जोशी आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव किशोर सोनसुरकर, शिराडा-वेळागर सर्व्हे नं. ३९ मधील संघर्ष समितीचे कार्याध्य़क्ष उदय भगत, आजू आमरे, सुधीर भगत, आग्नेल सोज, फास्कू फर्नांडिस, नेल्सन सोज, संतोष भगत, अब्राव मेमन, नीलेश चमणकर, सौ. श्वेता चमणकर यासह सर्व्हे नं. ३९ संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेत्या सर्व संघांच्या खेळाडूंचे पॉवरलिफ्टींगमधील ‘महाराष्ट्र लेडी’ किताब विजेत्या अनुजा तेंडोलकर व सामाजिक कार्यकर्ते रवी गोडकर यांनी मिठाई वाटप करून स्वागत केले.
बक्षीस वितरण सोहळा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, अजित राऊळ, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच राहूल गावडे, रेडी सरपंच रामसिंग राणे, आरवली सरपंच श्री. कुडव, दोडामार्ग रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष प्रा. मंडये, दिवाकर माळवणकर, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63837 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..