मालवण प्रभारी पोलिस निरीक्षकपदी यादव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण प्रभारी पोलिस 
निरीक्षकपदी यादव
मालवण प्रभारी पोलिस निरीक्षकपदी यादव

मालवण प्रभारी पोलिस निरीक्षकपदी यादव

sakal_logo
By

25904
मालवण ः प्रभारी पोलिस निरीक्षक विजय यादव यांचे स्वागत करताना पत्रकार समितीचे पदाधिकारी.

मालवण प्रभारी पोलिस
निरीक्षकपदी विजय यादव
मालवण, ता. १ ः येथील पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस निरीक्षकपदाचा कार्यभार विजय यादव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. श्री. यादव यांनी यापूर्वी मालवण पोलिस ठाण्यात कर्मचारी म्हणून काम केले आहे. पोलिस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर अमरावती, महामार्ग पोलिस विभागात त्यांनी काम केले. प्रशासनाची माहिती असलेला अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान, पत्रकार समितीच्यावतीने श्री. यादव यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ पत्रकार राजा खांडाळेकर, कुणाल मांजरेकर, अमित खोत, कृष्णा ढोलम, आप्पा मालंडकर आदी उपस्थित होते. मावळते पोलिस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांना यावेळी पत्रकार समितीच्यावतीने भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63842 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top