गतस्मृतींमध्ये रमले ''विद्या विहार''चे माजी विद्यार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गतस्मृतींमध्ये रमले ''विद्या विहार''चे माजी विद्यार्थी
गतस्मृतींमध्ये रमले ''विद्या विहार''चे माजी विद्यार्थी

गतस्मृतींमध्ये रमले ''विद्या विहार''चे माजी विद्यार्थी

sakal_logo
By

swt२५.jpg
L२५९७३
आजगावः विद्या विहार इंग्लिश स्कूलचे १९९२ दहावी, १९९४ बारावी बॅचचे विद्यार्थी.

गतस्मृतींमध्ये रमले ''विद्या विहार''चे माजी विद्यार्थी
आजगावात स्नेहमेळावा ः १९९२, १९९४ च्या वर्गमित्रांची भेट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः आजगाव येथील विद्या विहार इंग्लिश स्कूलच्या १९९२ दहावी व १९९४ बारावी (शास्त्र) शाखेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा बुधवारी (ता. १) काकतकर मंगल कार्यालय, आजगाव येथे उत्साहात झाला. या स्नेहमेळाव्याला मुंबई, गोवा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलाने करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या माजी शिक्षिका (कै.) वीणा माईणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रशालेचे माजी विद्यार्थी दीनानाथ काळोजी, संतोष गवस, श्री. वाघाटे, राजेश आजगावकर यांनी उपस्थित वर्गमित्रांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक राखी आजगावकर यांनी केले.
यावेळी सर्व उपस्थित वर्गमित्रांनी मनोगत व्यक्त करून शालेय जीवनातील सोनेरी आठवणींना उजाळा दिला. आपल्या काळातील शिक्षकांनी लावलेल्या कडक शिस्तीचा फायदा आपल्या जीवनात नक्कीच झाला. त्यामुळे जीवन यशस्वी होण्यास मदत झाली, असे मत सीमा साटेलकर यांनी व्यक्त केले. माजी पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर यांनी सर्व वर्गमित्रांना मैत्रीचे प्रतीक म्हणून सुपारीचे रोपटे भेट दिले. तसेच पशुपक्षी व इतर सजीवांच्या वसाहतीसाठी झाडे लावणे गरजेचे असून, हे कार्य आपण आपले कर्तव्य म्हणून बजावले पाहिजे, निसर्गाचे रक्षण केले पाहिजे, असा संदेशही मनीषा गोवेकर यांनी सर्वांना दिला.
या स्नेहमेळाव्यास संतोष गवस, दीनानाथ काळोजी, राखी आजगावकर, प्रवीण केरकर, राजेश आजगावकर, श्री. वाघाटे, अर्जुन कापडी, समीर पेडणेकर, महेश झांट्ये, मंगल कानजी, नयन रेवाडकर, कुसुम पांढरे, अर्चना आरोस्कर, मनीषा केदार, सीमा साटेलकर, शीतल मेस्त्री, मनीषा गोवेकर, रुपेश पालयेकर, मदन मुरकर, बाबू मेस्त्री, ज्ञानेश्वर नाणोसकर आदी वर्गमित्र उपस्थित होते. कार्यकम यशस्वी केल्याबद्दल दीना काळोजी, संतोष गवस व मनीषा गोवेकर यांचे सर्वांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63943 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top