वन्य प्राणी नुकसानीबाबत कुडाळात उद्या चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन्य प्राणी नुकसानीबाबत कुडाळात उद्या चर्चासत्र
वन्य प्राणी नुकसानीबाबत कुडाळात उद्या चर्चासत्र

वन्य प्राणी नुकसानीबाबत कुडाळात उद्या चर्चासत्र

sakal_logo
By

वन्य प्राणी नुकसानीवर
कुडाळात उद्या चर्चासत्र
कुडाळ ः वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान, समस्या व त्यांचे निराकरण या विषयावरील कुडाळ तालुकास्तरीय चर्चासत्र कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनशास्त्र महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय राणे व वनशास्त्र अभ्यासक श्री. मिलिंद पाटील (पिंगुळी, ता. कुडाळ) यांच्या प्रमुख (तांत्रिक मार्गदर्शन सादरीकरणासह) उपस्थितीत व फलोत्पादन महाविद्यालय, मुळदेचे प्राचार्य डॉ. हळदोणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. ४) जूनला सकाळी ९-३० वाजता फलोत्पादन महाविद्यालय, मुळदे येथे आयोजित केले आहे. कृषी, सामाजिक वनीकरण, वन विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी व वन्य प्राण्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या उपस्थितीत हे चर्चासत्र होणार आहे. या महत्त्वपूर्ण चर्चासत्रास उपस्थित राहावे, असे आवाहन निवृत्त कृषी अधिकारी श्रीधर गोरे यांनी केले आहे.

ओरोसला रविवारी
बुद्धिबळ स्पर्धा
ओरोसः सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल यांच्या मान्यतेने श्री चेस अकादमी, कणकवली आणि सुयोग चेस अकादमी, सुकळवाड यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय जिल्हास्तरीय १६ वर्षांखालील मुलामुलींसाठी ''बुद्धिबळ स्पर्धा २०२२''चे आयोजन रविवारी (ता. ५) ओरोस फाटा येथील श्री इच्छा गोविंद मंगल कार्यालय येथे केले आहे. इच्छुक स्पर्धकांनी ४ जूनपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्यावतीने केले आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्यास एक हजार रुपये, द्वितीय ७५० रुपये, तृतीय ५०० रुपये व तिन्ही विजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. तसेच क्रमांक चार ते दहा असे विजेते काढले जाणार असून, त्यांना बक्षिसे व मेडल देण्यात येणार आहेत.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63945 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top