
संक्षिप्त
मरिआई मित्रमंडळाच्या
अध्यक्षपदी स्वप्नील पारकर
दाभोळ ः दापोली शहरातील कोकंबआळी येथील मरिआई मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी स्वप्नील पारकर यांची नियुक्ती निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली आहे. या मंडळाच्या उपाध्यक्षपदी प्रितेश कर्लेकर, सचिव प्रितेश शिर्के तर खजिनदार म्हणून योगेश परांजपे यांची निवड करण्यात आली आहे.
दापोली आगाराच्या दारासमोर मोठा खड्डा
दाभोळ ः राज्य परिवहन महामंडळाच्या दापोली आगाराच्या दारासमोर मोठा खड्डा पडला असून, यामुळे एसटी बस व प्रवाशांना आगारात प्रवेश करताना अडचण होत आहे. दापोली बसस्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करत असतात; मात्र बसस्थानकाच्या दारात मोठा खड्डा पडला आहे. तसेच पावसाचे पाणी साचून या खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक प्रवाशांच्या अंगावर पाणी उडत असून प्रवासी भिजत आहेत. हा खड्डा न बुजवल्यास मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीने हा खड्डा बुजवावा, अशी मागणी प्रवासीवर्गाकडून होत आहे.
ए. जी. हायस्कूलचे ड्राईंग परीक्षेत यश
दाभोळ ः नुकत्याच जाहीर झालेल्या ड्रॉईंग ग्रेड परीक्षेच्या निकालात ए. जी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. एलिमेंटरीचा निकाल १०० टक्के लागला असून, ए ग्रेड सोहम साने, वरद नाटेकर, श्रीईशा करंदीकर, स्वराज कुलम, मयुरी जुझम, पायल बागडे, तन्वी गोलांबडे या विद्यार्थ्यांना मिळाला आहे तर बी ग्रेडमध्ये २१ विद्यार्थी, सी ग्रेडमध्ये ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इंटरमिजिएटचाही निकाल १०० टक्के लागला असून, ए ग्रेड श्रीनंद जोशी, जान्हवी पवार, ऋतू सुवरे, दीक्षा भेकत, संचित गायकवाड या विद्यार्थ्यांना मिळाला असून, बी ग्रेडमध्ये १५ तर सी ग्रेडमध्ये २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्रीराम महाजन व संजय दळवी यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश जोशी, उपमुख्याध्यापक शरद कांबळे, पर्यवेक्षक, संस्थाचालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63958 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..