
कनेडी : बियाने वाटप
L25994
कुंभवडे ः गावातील शेतकऱ्यांना सतीश सावंत यांच्या हस्ते भात बियाण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उत्तम लोके, आप्पा तावडे आदी उपस्थितीत होते.
---------
शेतकरी आर्थिक समृध्द झाला पाहीजे - सतीश सावंत
कनेडी, ता २ ः शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहीले तर शेतीतून शेतकऱ्यांला लागले उत्पन्न मिळेल. संकरीत आणि सुधारीत भात बियाणाचा वापर, यांत्रिकीकरणाची कास धरल्यास शेतकरी आर्थिक समृध्द होईल असा आमचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँके माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी कुंभवडे येथे बोलताना केले. कुंभवडे ग्रामपंचायत मार्फत मोफत भात बियाणेचे वाटप सतिश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी कुंभवडे सरपंच सूर्यकांत उर्फ आप्पा तावडे, युवा सेना कणकवली उपतालुकाप्रमुख उत्तम लोके, युवा सेना कणकवली समन्वयक गुरू पेडणेकर, शाखाप्रमुख प्रकाश बिले, ग्रामसेवक प्रशांत वर्दम, कृषीसेविका शीतल सावंत, पोलीस पाटील प्रकाश गावकर, ग्रामपंचायत सदस्य, गावातील शेतकरी तसेच महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्री. सावंत यांनी शेतकऱ्याना शेती संदर्भात मार्गदर्शन केले. आर्थिक फायदा करून घेण्यासाठी शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले. शेती सोबत शेतीपुरक व्यावसाय कारा, बचत गटाच्या माध्यमातून महीला सक्षण झाल्या पाहीजेत. या गावातील कुंटुंबाला पुरेल असा भाजीपाला पिकवा. खासदार अरविंद सावंत यांच्या माध्यमातून या गावाला धरण प्रकल्प मिळाला आहे. या धरणाचे कामपुर्ण झाल्यावर शेतकऱ्यांनी शेती व्यावसाय करावा. त्याचे नियोजन आजपासुन करावे. सामुहीक शेती ही फायदेशी आहे असे मत व्यक्त केले. यावेळी सरपंच श्री. तावडे यांनी मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक प्रशांत वर्दम यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63972 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..