गुहागर ः कृषी अधिकारी शेताच्या बांधावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः कृषी अधिकारी शेताच्या बांधावर
गुहागर ः कृषी अधिकारी शेताच्या बांधावर

गुहागर ः कृषी अधिकारी शेताच्या बांधावर

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat2p20.jpg ः KOP22L26012उमराठ ः टोकन पद्धतीने भातलागवडीचे प्रात्यक्षिक दाखवताना कृषी अधिकारी आणि शेतकरी.
--------------

कृषी अधिकाऱ्यांचे बांधावर मार्गदर्शन
उमराठमध्ये भातशेती कार्यशाळा ; भात बियाण्याचे वाटप
गुहागर, ता. २ ः तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायतीची निवड भातशेतीच्या कार्यशाळेसाठी करण्यात आली आहे. येथील शेतकऱ्यांना बी-बियाण्यांच्या माहितीपासून सुधारित पद्धतीने लागवड, लावणी, कापणी आदी टप्प्यांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पादन वाढवावे हा या निवडीचा हेतू आहे, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक संजय सानप यांनी दिली.
उमराठमध्ये भातशेती कार्यशाळाच्या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम नुकताच झाला. सुरवातीला ग्रामदेवता श्री नवलाई देवी मंदिरात शेतकऱ्यांना सुधारित शेतीपद्धती, नवीन संकरित बी-बियाणे याची माहिती संजय सानप यांनी दिली. भात बियाण्याची गुणवत्ता, उगवण क्षमता कशी ओळखावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष शेतात जाऊन टोकन पद्धतीने भातलागवड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यंत्रसामुग्री मार्गदर्शक अभिनव निंगडे यांनी फळबाग लागवड आणि कृषी यांत्रिकीकरण या विषयी माहिती दिली तसेच कृषीमधील आधुनिक यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवले. शेतकर्‍यांनी फळझाडे लागवड आणि शेती लागवड करताना आधुनिक तंत्रज्ञान वापरून यांत्रिकीकरण आणि कृषी विभागाच्या सुधारित संकरित बियाणांचा वापर करावा, असे आवाहन या वेळी उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थितांना केले.
समारोपावेळी सानप म्हणाले की, उमराठमधील शेतकऱ्यांना यापुढे विनामशागत जागेत सराईत पद्धतीने पेरणी कशी करावी, वाफा पद्धतीचा अवलंब करून रोपवाटिका तयार करणे, वाढणाऱ्या रोपांची निगा राखणे, आवश्यकता भासल्यास किटकनाशक औषधांची फवारणी करणे, वाफ्यांतील तण काढणे, रोपांची लागवड करणे, तयार पिकांची कापणी, मळणी आदी गोष्टींचे मार्गदर्शन वेळोवेळी टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. याच कार्यशाळेत इच्छुक शेतकऱ्यांना नाचणी आणि संकरित भातबियाणांचे वाटप करण्यात आले. या वेळी कृषी विभागाचे पर्यवेक्षक संजय सानप, कृषिसेवक सतीश सपकाळ, यंत्रसामुग्री मार्गदर्शक अभिनव निंगडे, ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, ग्रामपंचायत सदस्या प्रज्ञा पवार, सहाय्यक नितीन गावणंग, ग्रामरोजगार सेवक प्रशांत कदम, महेश गोरिवले यांच्यासह उमराठमधील शेतकरी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y63988 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top