
रत्नागिरी ः जिल्ह्यातील 28 एएसआयना बढती
जिल्ह्यातील 28 एएसआयना बढती
ठाण्यात वाढले अधिकारी ; ताण होणार कमी
रत्नागिरी, ता. २ ः जिल्हा पोलिस दलातील २८ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांना बढती देण्यात आली आहे. तब्बल तीस वर्षाहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या या एएसआयना आता पोलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. त्यामुळे या पोलिस अधिकाऱ्यांचे बढतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. बढती मिळाल्यामुळे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची संख्या वाढली असून काहीसा कामाचा ताण कमी होणार आहे.
पोलिसदलात ३० वर्ष सेवा बजावलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आनंदराव पवार (गुहागर), यशवंत बोडकर (कशेडी), रवींद्र तारये (मुख्यालय), लक्ष्मण इंधन( रत्नागिरी शहर), शांताराम वाघ, धर्मराज चव्हाण, नामदेव उंडे ( मुख्यालय), जितेंद्र घाणेकर (खेड), दीपक साळवी( ग्रामीण), प्रदीप सुपल, संतोष पवार, संभाजी जाधव (मुख्यालय), मुकुंद देसाई( ग्रामीण), जगदीश करगुटकर (मुख्यालय), राजेंद्र देसाई ( लांजा), जयवंत सोनावणे (दापोली), दत्ता पवार (बाणकोट), अविनाश पवार( देवरूख), संगम कांबळे (मुख्यालय), रमेश जानवलकर( सावर्डे), दत्ताराम आखाडे (मोपवि), रघुनाथ मोंडूला( ग्रामीण), अनंता बसवंत (मुख्यालय), नाना शिवगण (सुरक्षा), धोंडू गोरे (दापोली), सुरेश खरात( अलोरे), भगवान पाटील, शालन शिंगाडे ( रत्नागिरी शहर) या पोलिसांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील २८ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यांच्या बढतीचे आदेश ३० मे रोजी पोलिस अधीक्षकांनी काढले. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याला भगवान पाटील, शालन शिंगाडे, लक्ष्मण इंधन हे अधिकारी मिळाले आहेत.
---------------
चौकट-
पोलिस नाईक हा संवर्ग रद्द
शासनाच्या गृहविभागाने पोलिस नाईक हा संवर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलिसदलात शिपाई म्हणून सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता थेट हवालदारपदी बढती मिळणार आहे. नाईक संवर्गातील कर्मचाऱ्यांना बढती देण्यापूर्वी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना बढती देण्याचे आदेश देण्यात आले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64000 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..