रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

दापोली तालुक्यात आगोटची कामे बाकी
दाभोळ ः दापोलीत अजून शेतकऱ्यांची पावसाळ्यापूर्वीची अर्थात आगोटची कामे शिल्लक आहेत; मात्र पावसाची जोरदार रिपरिप सुरू असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ चिंता व्यक्त करत आहेत. सध्या दिवसभर ऊन तर रात्रीच्या सुमारास पावसाची रिपरिप सुरू असते; मात्र शेतकऱ्यांची अद्याप पावसाळ्यात चूल पेटवण्यासाठी लाकडे फोडण्याची, लाकडे सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची, गुरांचा पेंढा सुरक्षित तसेच घराची कामे अद्याप सुरूच असल्याचे चित्र सध्या दापोलीत पाहायला मिळत आहे. त्यामुळे रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे सुकी लाकडे व इतर साधनसामुग्री भिजत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थाकडून सुक्या लाकडांवर प्लास्टिक कागद टाकून सुरक्षित करून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरात लवकर पावसाळ्यात लागणारी साधनसामुग्री सुरक्षित न केल्यास पावसात भिजण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.

मंडणगडात १६ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण सोडत
मंडणगड ः जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या मंडणगड तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींचे अंतिम प्रभाग रचना २७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाने अडखळ, बाणकोट, दहागाव, देव्हारे, दुधेरे-बामणघर, कुंबळे, लोकरवण, मुरादपुर, पिंपळोली, शिगवण, सडे, तिडे-तळेघर, वेसवी, विन्हे, घराडी, निगडी या ग्रामपंचायतींचा आरक्षण कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे. यानुसार तहसीलदार मंडणगड दत्तात्रय बेर्डे यांनी या १६ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण टाकण्यासाठी १६ अध्यासी अधिकारी यांची नेमणूक केलेली असून आरक्षण टाकण्याची कार्यवाही संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ६ जूनला सकाळी १० वा. सोडत पद्धतीने टाकण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीसाठी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांना विशेष ग्रामसभा आयोजित करण्याबाबत तहसीलदार मंडणगड यांनी निर्देश दिलेले आहेत. ग्रामसभेस नागरिकांनी उपस्थित राहण्याबाबत तहसीलदार मंडणगड यांनी आवाहन केलेले आहे.


पर्यावरण दिनानिमित्त प्रभातफेरी
दाभोळ ः दापोली नगरपंचायतीच्यावतीने प्लास्टिक बंदी व वृक्षारोपण करण्याबाबत स्वच्छता व आरोग्य विभागाच्यावतीने ५ जूनला पर्यावरण दिनानिमित्त प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. प्लास्टिकमुक्त दापोली हा या मागचा हेतू असल्याचे नगरपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले आहे. या दिनानिमित्त ५ जूनला सकाळी १० वा. नगरपंचायत कार्यालय येथून प्रभातफेरी सुरू होणार आहे. तरी या प्रभातफेरीत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे; मात्र नगरपंचायतीच्यावतीने प्रत्येक प्रभागात प्लास्टिक बंदी व वृक्षारोपण करण्याबाबत प्रभातफेरी काढली जात आहे. प्लास्टिक व वृक्षारोपणाबाबत नगरपंचायत गांभीर्याने पाऊल उचलत असल्याचे चित्र सध्या सुरू असलेल्या प्रभागवार प्रभातफेरीवरून समोर येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64005 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top