चिपळूण ः ओवळी गावचा निर्धार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः ओवळी गावचा निर्धार
चिपळूण ः ओवळी गावचा निर्धार

चिपळूण ः ओवळी गावचा निर्धार

sakal_logo
By

पान 1 फ्लायर

सुखद काही ...............लोगो
---------------
फोटो - ratchl22.jpg ः KOP22L25968चिपळूण ः ग्रामसभेला उपस्थित महिला व ग्रामस्थ.


ओवळी गावात विधवा प्रथेचे उच्चाटने

कुप्रथा बंद करण्याचा ठराव ; ग्रामसभेत महिलांचा पुढाकार
चिपळूण, ता. २ ः पती निधनानंतर महिलेला विधवा म्हणून जगावे लागणे आणि त्यासोबत विधवांसंबंधी कुप्रथा, त्यातून अशा महिलांना मिळणारी अवहेलनाकारक वागणूक मोडीत काढण्याचे प्रागतिक पाऊल हेरवाड (जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीने उचलले आणि त्याचे फार मोठे कौतुक झाले. चिपळूण तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीने हेरवाडच्या पावलावर पाऊल टाकले आहे. तेथील ग्रामसभेने विधवा प्रथेला तिलांजली देण्याचा एकमुखी ठराव संमत केला. विशेष म्हणजे यात महिला आघाडीवर होत्या.
आज विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असलो तरीही पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे यांसारख्या प्रथांचे समाजात पालन केले जाते. पतीच्या निधनानंतर पत्नीला विधवा म्हणून समाजात वावराताना अवहेलनेस सामोरे जावे लागते. अशा महिलांना समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही. या कुप्रथा बंद करून त्याचे उच्चाटन करण्याचा ठराव तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एकमताने करण्यात आला.
शेकडो वर्षापासून पिढ्यानपिढ्या अनेक रूढी-परंपरा समाजात अंमलात आणल्या जात आहे. काही रूढी-परंपरा बंद करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला सामाजिक स्तरावरच विरोध होतो. त्यामुळे समाजातील काही कुप्रथा बंद व्हाव्यात, त्याबाबत समाजात जनजागृती व्हावी, विधवा महिलांनाही मानसन्मानाने समाजात जगता यावे यासाठी अशा प्रथांचे उच्चाटण होण्यासाठी गावस्तरावरच निर्णय घेण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने कुप्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची दखलही राज्य सरकारने घेत तसे परिपत्रकदेखील काढले आहे. तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत या कुप्रथाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे, पतीच्या पश्चात त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी या कुप्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज २१ व्या शतकात वावरताना विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत; मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे दिसून येते. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात आहे. या कुप्रथांचे पालन होत असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. या महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामुळे अशा प्रथेचे निर्मुलन होण्यासाठी ग्रामसभेत तसा ठराव करण्यात आला. ग्रामसभेला अध्यक्षपदी शांताराम शिंदे, माजी सरपंच सुदेश शिंदे, उदय कदम, नंदकुमार शिंदे, शंकर शिंदे, प्रियंवदा शिंदे, दीक्षा शिंदे, सतीश शिंदे, दत्ताराम शिंदे, रामचंद्र झोरे, अपर्णा सुर्वे, गजेंद्र शिंदे यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
-------
कोट
गावच्या ग्रामसभेत विधवा महिलाबाबत कुप्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने झालेला आहे. ग्रामसभेस उपस्थित महिलांनी त्याचे स्वागतच केले आहे. ही प्रथा समुळ नष्ट होण्यासाठी यापुढच्या कालावधीत जनजागृतीही करावी लागणार आहे. मात्र या निर्णयामुळे विधवा महिलांना सन्मानाने जगण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे.
- शेवती पवार, सरपंच ओवळी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64012 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top