
म्हणी म्हणजे मराठी भाषेच्या खाणी
L26025
आचरा ः येथे ''म्हणींचे मूळ आणि वाक्प्रचारांचे कुळ'' या व्याख्यानात उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुरेश ठाकूर.
म्हणी म्हणजे मराठी भाषेच्या खाणी
सुरेश ठाकूर ः आचऱ्यात ''म्हणींचे मूळ आणि वाक्प्रचारांचे कुळ''वर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २ ः मराठी भाषेतील वाक्प्रचार आणि म्हणी या अनुभवांच्या खाणी आहेत. त्या भाषेला सौंदर्य आणि मोहकता आणतातच, शिवाय आपल्याला जे सांगायचे ते अधिक परिणामकारक रीतीने आणि प्रभावीपणे व्यक्त करतात. म्हणूनच त्या मराठी भाषेतील अजिंठा वेरूळ लेणी आहेत. या भाषेच्या लेण्यांचे कूळ आणि मूळ प्रत्येक मराठी भाषेच्या अभ्यासकांनी समजून घेतले पाहिजे, असे मत कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी आचरा हायस्कूल येथे आयोजित व्याख्यानात व्यक्त केले.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी, रामेश्वर वाचन मंदिर आचरे आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ''म्हणींचे मूळ आणि वाक्प्रचारांचे कुळ'' या व्याख्यानात ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमात मराठी भाषेतील शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी कोणकोणत्या भाषेतून आल्या, त्याचा अपभ्रंश कसा झाला, इंग्रजी, पारशी, अरबी, कन्नड, तामीळ भाषांना मराठीने आपली समजून कसे आत्मसात केले याची उदाहरणे श्री. ठाकूर यांनी रंजकपणे कथन केली. या मार्गदर्शनपर व्याख्यानाला रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचराचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्यासहित जँकारीन फर्नांडिस, लक्ष्मण आचरेकर, अर्जुन बापर्डेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कपिल मेस्त्री, विनिता कांबळी, अनिरुद्ध आचरेकर, पांडुरंग कोचरेकर, रामचंद्र कुबल, सुगंधा गुरव आदी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बहुसंख्य साहित्य रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे उपाध्यक्ष सुरेश गावकर यांनी तर बाबाजी भिसळे यांनी आभार मानले.
-----------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64014 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..