रत्नागिरी-मांडवीतील गटाराचे काम अर्धवट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-मांडवीतील गटाराचे काम अर्धवट
रत्नागिरी-मांडवीतील गटाराचे काम अर्धवट

रत्नागिरी-मांडवीतील गटाराचे काम अर्धवट

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२p२४.jpg-KOP२२L२६०३७ रत्नागिरी ः मांडवीतील गटाराचे काम अर्धवट सोडल्याने असुरक्षित बनले आहे.
----------------

मांडवीतील गटाराचे काम अर्धवट
उघडी गटारे धोकादायक ; दुर्गंधीमुळे नागरिक हैराण
रत्नागिरी, ता. २ : पालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर मांडवी येथील गटारांचे काम काढले आहे. ८० फुटी हायवेचे पाणी मांडवीतून समुद्राला जाणाऱ्या गटाराला जोडण्यात येत आहे. त्यासाठी मांडवीतील गटाराची खोली वाढविण्यासाठी त्याच्यावरील लाद्या, स्लॅब जेसीबीने फोडून ते गटार उघडे केले आहे. पाऊस कधीही सुरू होण्याची शक्यता असताना हे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. या उघड्या गटारामुळे नागरिकांना डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्लॅब तोडताना सळ्या बाहेर राहिल्याने उघडे गटार धोकादायक आणि असुरक्षित बनले आहे. पालिका प्रशासनाने सुरक्षेच्यादृष्टीने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे.
शहराला समुद्राच्या बाजूने नैसर्गिक उतार असल्याने शहरातील माळनाकापासूनचे पाणी अनेय नाल्यांच्या माध्यमातून सहज समुद्राला मिळते. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आणि सुधारित पाणी योजनेच्या खोदाईन शहरवासीयांची दैना उडाली होती. गटार तुंबल्याने मुख्य बाजारपेठेत पाणी भरले होते. मात्र त्यानंतर पालिकेने अनेक गटारांचे काम करून घेतले आहे. शहरातील पाणी आठवाडा बाजार, रहाटघरमार्गे मांडवी गटारातून समुद्राला मिळते. मांडवीतील काही अपार्टमेंटनी या गटारावर स्लॅब टाकून ये-जा करण्यासाठी मार्ग केला आहे. मात्र पावसाळा तोंडावर असताना पालिनेके अचानक या गटारावरील लाद्या आणि स्लॅब जेसीबीने फोडून हे गटार उघडे केले आहे. गटारात स्लॅब पडल्याने पाणी अडल्याने दुर्गंधी पसरली आहे.
८० फुटी हायवेच्या गाटाराला पुढे खालचीआळी येथे विरोध झाल्याने ते गटाराचे पाणी भुते नाका येथे रस्ता खोदून ते मांडवीच्या गटाराला जोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी अर्धा रस्ता खोदून स्लॅब टाकण्यात आला आहे. या पाण्याला उतारा (स्लोप) मिळावा यासाठी मांडवीचे गटार उघडे करून ते चार ते पाच फुट खोल करण्यात येणार आहे. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये कोणतीही हालचाल नाही. येथील गटारे उघडी करून ठेवली आहेत. या अर्धवट कामामुळे मांडवी बंदराकडे जाणाऱ्या पर्यटकांना उघडे गटार अडचणीचे ठरत आहे. समोरुन वाहन आले तर वाहतूक कोंडी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64066 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top