रत्नागिरी-दरडींची लक्षणे फ्लायरद्वारे लोकांपर्यंत पोचवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-दरडींची लक्षणे फ्लायरद्वारे लोकांपर्यंत पोचवणार
रत्नागिरी-दरडींची लक्षणे फ्लायरद्वारे लोकांपर्यंत पोचवणार

रत्नागिरी-दरडींची लक्षणे फ्लायरद्वारे लोकांपर्यंत पोचवणार

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat2p36.jpg- KOP22L26075 दरडीविषयक माहिती देणारी पत्रके
-----------

दरडींची लक्षणे पत्रकाद्वारे लोकांपर्यंत पोचवणार

जिल्हाप्रशासन; सोशल मीडियाद्वारे माहिती पत्रकाचा प्रसार
रत्नागिरी, ता. २ ः गतवर्षी झालेल्या ढगफुटीमुळे महापूर आणि दरडी कोसळण्याचे प्रकार सह्याद्रीच्या खोऱ्यात घडल्याने मानवीवस्तीला धोका निर्माण झाला होता. यंदा हे प्रकार घडल्यास तेथील वाड्या वस्त्यांमध्ये जीवितहानी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘न्यूटन जागवा, दरडी थोपवा’ अभियान जिल्हाभरात राबवले आहे. दरडप्रवण भागातील निरीक्षणावर आधारित माहिती पत्रक) सोशल मिडियाद्वारे तळागाळातील घटकापर्यंत पोचवण्यात येत आहे.
गतवर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी दरम्यान सह्याद्री परिसरात दरडी कोसळून काही व्यक्ती गाडल्या गेल्या, काही महापूरात वाहून गेल्या. त्याची पुनरावृत्ती यंदाच्या पावसात होऊ नये, यासाठी जिल्हाप्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी महिन्याभरापूर्वी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत उपाययोजनांना सुरवात केली. खेड, चिपळूण, संगमेश्‍वर या तीन तालुक्यात सर्वाधिक ९६ दरडप्रवण भाग आहेत. तेथील लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भूगर्भतज्ज्ञ डॉ. सतीश ठिगळे यांचे व्याख्यान तिन्ही तालुक्यात झाली. दरडींची लक्षणे कशी ओळखायची, प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर काय करता येईल याची माहिती डॉ. ठिगळे यांनी लोकांना दिली. याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे दरडी कोसळण्याची लक्षणे ओळखणे, डोंगर उताराचा समतोल राखणे, विद्यार्थ्यांनी करावयाची निरीक्षणे, ग्रामस्थांनी करावयाची निरीक्षणे, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास घ्यावयाची काळजी याची माहिती देणारी दोन पत्रके काढली.

कोट
दरडप्रवण तालुक्यातील गावांमध्ये साक्षरता अभियान राबविले जात आहे. यामध्ये एका दरड प्रवण भागातील ठिकाणांना भेटी देऊन दरडपूर्व चिन्ह यावर मार्गदर्शन करण्यात आले.
- अजय सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64079 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top