रत्नागिरी ः मच्छीमारांकडून बंदीचे उल्लंघन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः मच्छीमारांकडून बंदीचे उल्लंघन
रत्नागिरी ः मच्छीमारांकडून बंदीचे उल्लंघन

रत्नागिरी ः मच्छीमारांकडून बंदीचे उल्लंघन

sakal_logo
By

फोटो ओळी
- rat2p18.jpg- २५९९२
रत्नागिरी ः बंदीचे उल्लंघन करून आरे-वारे किनाऱ्यापासून पुढे समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौका.
- rat2p17.jpg- २५९९१
आरे-वारे किनारी येऊन मासेमारी करणारी एक नौका.
(राजेश कळंबटे ः सकाळ छायाचित्रसेवा)
-----------------


बंदी असूनही मासेमारी सुरूच
आरे-वारे, गणपतीपुळे मच्छीमारांकडून बंदीचे उल्लंघन; कोळंबीवर उड्या

रत्नागिरी, ता. २ ः शासनाच्या आदेशानुसार, समुद्रकिनारी भागात १ जूनपासून मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे; मात्र बंदीचे उल्लंघन करून अनेक मच्छीमारी अजूनही अनधिकृतपणे मासेमारी करत आहेत. गुरुवारी (ता. २) दुपारी आरे-वारे, गणपतीपुळेपासुन पुढे किनाऱ्याजवळ येऊन मासेमारी केली जात होती. यावर कडक कारवाईची मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.
पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे अनेक मासे किनाऱ्यालगत येतात. ही मासळी पकडण्यासाठी मच्छीमार समुद्रात धाव घेतात. परिणामी मत्स्य दुष्काळाची परिस्थिती गेल्या काही वर्षात ओढवू लागली आहे. यावर मात करण्यासाठी कायद्यानुसार १ जूनपासून महाराष्ट्रात मासेमारी बंदी लागू केली आहे. ३१ जुलैपर्यंत हा बंदी कालावधी आहे. यंदा मॉन्सून लवकर दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे; परंतु समुद्र शांत असून, पाण्याला तेवढा करंट नाही. हवामानही कोरडे असल्यामुळे मच्छीमारांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे गुरुवारी काही मच्छीमारांनी बंदी कायद्याचे उल्लंघन करत लाटांवर स्वार होणे पसंत केले आहे. आरे-वारेपासून काही अंतरावर समुद्रात दहाहून अधिक नौका मासेमारी करताना आढळल्या. काही नौका तर आरे-वारे किनाऱ्यालगत येऊन जाळी मारत होते. त्यांच्याकडे प्रशासनाचेही पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. शासनाने बंदी लागू केल्यानंतर मच्छीमारांनी आपणहून नौका किनाऱ्यावर ओढून ठेवणे आवश्यक आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे दिसत आहे.
पाऊस सुरू होण्यापूर्वी काही काळ आधी किनारी भागात कोळंबी मिळते. याच कोळंबीसाठी बंदीचे उल्लंघन करून फिशिंगच्या नौकांनी उड्या घेतल्या आहेत. कोरड्या वातावरणामुळे त्यांना मोकळं रान मिळाले असून, मत्स्य विभागाचेही दुर्लक्ष झाले आहे. सध्या कोळंबीला किलोला ३०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. हंगामाच्या अखेरीस कोळंबीवर ताव मारून नफा कमवण्यासाठी मच्छीमार सरसावले आहेत. जून महिन्यापासून मत्स्य विभागाच्या गस्ती नौकाही पाण्यात जात नाहीत. त्याचा फायदा अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांकडून उठवला जात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारपासून किनारपट्टी भागात वारे वाहू लागले होते. केरळपर्यंत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाकडून सांगितले जात आहे. कोकणात पुढील चार दिवसांत पावसाला सुरवात होईल, अशी शक्यता आहे.
---
चौकट
अडीच हजार अधिकृत नौका

रत्नागिरी जिल्ह्यात मिरकरवाडा हे सर्वात मोठे बंदर असून, जिल्हाभरात लहान आणि मध्यम स्वरूपाची अशी ४० बंदरे असून २ हजार ५९८ नौका आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ४५० नौका यांत्रिक असून, उर्वरित २०० नौका बिगर यांत्रिक आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64096 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top