रत्नागिरी-महिलेला लुटणारा तोतया पोलिस अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-महिलेला लुटणारा तोतया पोलिस अटक
रत्नागिरी-महिलेला लुटणारा तोतया पोलिस अटक

रत्नागिरी-महिलेला लुटणारा तोतया पोलिस अटक

sakal_logo
By

महिलेला लुबाडणारा तोतया पोलिसास अटक

६ मेपर्यंत पोलिस कोठडी ः महिनाभरातच गुन्हा उघड

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः शहरातील नरहर वसाहत-धन्वंतरी हॉस्पिटल दरम्यान पोलिस असल्याचे सांगून वृद्ध महिलेला १ लाख ४० हजाराचे दागिने चोरणाऱ्या तोतया पोलिसाला अटक केली. कोल्हापूर न्यायालयाच्या परवानगीने शहर पोलिसांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
शब्बीर जावेद जाफरी (वय ३४ रा. मुळ लोणी काळभेर, हवेली, पुणे, सध्या रा. परळी वैजनाथ, बीड) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा शिवाजी पावसकर (वय ६२, रा. शंखेश्वरनगर, आरोग्यमंदिर, रत्नागिरी) या ७ मे रोजी सायंकाळी चालत जात असताना फोम वॉश येथे आल्यानंतर दोन अनोळखी व्यक्ती सौ. पावसकर यांच्या पाठीमागून आले. आम्ही पोलिस आहोत, असे सांगून त्यांच्या गळ्यातील ५५ हजाराचे काळे मणी असलेले सोन्याचे मंगळसूत्र व ८५ हजाराच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. त्या बदल्यात दोन पिवळसर धातूच्या बांगड्या रुमालात-कागदात बांधून देऊन सौ. पावसकर यांची फसवणूक केली. या प्रकरणी सौ. श्रद्धा पावसकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शांताराम महाले करत आहेत.
शब्बीर जाफरी हा कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्हा ताब्यात होता. मुख्य न्यायदंडाधिकारी कोल्हापूर यांची मंजुरी घेऊन अधीक्षक सबजेल कोल्हापूरमधून १ जूनला त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताने अन्य ठिकाणी गुन्हे केले आहेत का? या गुन्ह्यातील मुद्देमाल यावर पोलिसांचा तपास सुरू आहे. संशयिताची जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64146 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top