
पान पाच मेन-विज अधिकाऱ्यांविरुध्द धरणे
L२६०९०
- कोनाळकट्टा ः जलसंपदा उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना जाब विचारताना शिवसेना पदाधिकारी.
विज अधिकाऱ्यांविरुध्द धरणे
कोनाळकट्ट्यात आंदोलन ः थकित देयकांमुळे पुरवठा खंडीत
सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. २ : थकित वीज देयकाअभावी वीजपुरवठा खंडित केल्याने कोनाळकट्टा जलसंपदा उपविभागीय कार्यालयात मुख्य वसाहतीतील नागरिकांनी धरणे आंदोलन केले.
कोनाळकट्टा जलसंपदा मुख्य वसाहतीमधील धरण व्यवस्थापन कार्यालयावरती खंडित वीज पुरवठा सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी धरणे आंदोलन केले. गेले दोन दिवस वसाहतीमधील विज पुरवठा बंद होता. त्यामुळे वसाहतींचा पाणी पुरवठा बंद होता. संतापलेल्या नागरिकांनी कोनाळ शिवसेना विभाग प्रमुख संतोष मोर्ये यांच्या नेतृत्वाखाली कोनाळकट्टा उपविभागीय अभियंता कार्यालयामध्ये जाऊन गजानन बुचडे यांना घेराव घातला. बंद असलेल्या विज पुरवठ्याबाबत बुचडे यांच्यावरती प्रश्नांचा भडिमार केला. नागरिकांनी लघु वसाहतीची ६८ हजार रूपये थकबाकी असताना, तेथील विज पुरवठा बंद न केल्याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून जाब विचारला; परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून मुख्य वसाहतीचा विज पुरवठा तोडण्यासंदर्भात आलेल्या पत्राकडे दोडामार्गातील अधिकारी नलवडे यांनी बोट दाखविले. श्री. मोर्ये यांनी आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व श्री. बुचडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा घडवून आणली.
तिलारी जलसंपदा विभागातील मुख्य वसाहतीचे विज पुरवठा खंडित करण्यात आला. रविवारच्या सुट्टीमुळे व दोन दिवसात विज पुरवठा बंद असल्यामुळे वसाहतीचा पाणी पुरवठा बंद होता. वसाहती जवळ पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत नसल्यामुळे रहिवाश्यांनी कोनाळ शिवसेना विभाग प्रमुख मोर्ये ,कोनाळ युवा उप विभाग प्रमुख सचिन केसरकर यांना घेऊन कोनाळ कट्टा जलसंपदा कार्यालयावरती धडक दिली. उप अभियंता बुचडे व भ्रमण दुरध्वनीवरून कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांना वीजबिल भरणा करण्याबाबत विचारणा केली. श्री. कोरे यांनी लवकरच विद्युत थकबाकीची रक्कम महावितरणकडे भरण्यात येईल, असे आश्वासन दिले; परंतु महावितरणचे अधीक्षक अभियंता पाटील व कार्यकारी अभियंता यांनी लेखी हमी पत्राची मागणी केली. श्री. मोर्ये यांनी लेखी हमीपत्र दिल्याशिवाय कार्यालयातून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर श्री. कोरे यांनी ३१ जूनपुर्वी थकित रक्कम भरण्याचे लेखी हमीपत्र महावितरणला दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित केले. जलसंपदा विभाग वसाहतीमधील समस्या जाणीव पुर्वक सोडवत नसल्याबद्दल मोर्ये यांनी बुचडे यांना धारेवरती धरले. वसाहतीकरिता आवश्यक असणारे कर्मचारी दिले नाही व वसाहतीचे प्रश्न सुटले नाहीत तर वसाहतीमधील नागरिकांना घेऊन १५ ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा त्यांनी बुचडे यांना दिला. श्री. कोरे या़ंच्या पत्रानंतर वसाहतीमधील विजपुरवठा सूरू झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64149 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..