बांदा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा
बांदा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा

बांदा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा

sakal_logo
By

बांदा येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा
बांदाः शिवविचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्यासाठी काम करत असलेल्या येथील शिवतेज सेवा संस्थेच्यावतीने सोमवारी (ता. ६) बांदा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ''हंबीरराव मोहिते''फेम ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल गवस प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ वाजता पुरोहितांच्या उपस्थितीत अभिषेक केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने शिवराज्याभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी अभिनेते अनिल गवस उपस्थितांना शिवविचारांवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, शिवप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवतेज सेवा संस्थेच्यावतीने केले आहे.
.................
‘शिवराज्याभिषेक’वर भरड येथे व्याख्यान
मालवण : भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरच्यावतीने रविवारी (ता. ५) वाचन मंदिरच्या नवीन इमारतीत सायंकाळी पाच ते सहा या वेळेत शिवराज्याभिषेक या विषयावर रघुनाथ शेवडे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. ६ जून १६७४ हा शिवराज्याभिषेक दिन होय. या दिवशी रायगडावर श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती श्री शिवाजी महाराज झाले. याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शककर्ते झाले. हा शुभदिन स्वराज्याची, सार्वभौमत्व, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा आहे. यानिमित्त श्री शिवाजी वाचन मंदिर मालवणतर्फे शिवराज्याभिषेक या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात केले आहे.
...............
बांद्यात आज ई-श्रम कार्ड वाटप
बांदा ः केंद्राच्या प्रधानमंत्री जनकल्याण योजनेअंतर्गत या योजनेचे प्रदेश सचिव नारायण सावंत व बांदा भाजपच्यावतीने शहरात राबविण्यात आलेल्या ई-श्रम कार्ड योजनेच्या कार्डचे वाटप उद्या (ता. ३) सकाळी १० वाजता ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी शहराच्या विविध प्रभागात कार्ड काढले आहे, त्यांनी उद्या येऊन आपले कार्ड ताब्यात घ्यावे, असे आवाहन बांदा भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.
............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64166 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top