रत्नागिरी ः पुराव्याचे पेन ड्राइव्ह जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः पुराव्याचे पेन ड्राइव्ह जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे
रत्नागिरी ः पुराव्याचे पेन ड्राइव्ह जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे

रत्नागिरी ः पुराव्याचे पेन ड्राइव्ह जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे

sakal_logo
By

पुराव्याचे पेन ड्राइव्ह
पोलीस अधिक्षकांकडे
मिरकरवाडा बंदरावर चोऱ्या ; तपासाची चक्रे फिरली
रत्नागिरी, ता. २ ः मिरकरवाडा बंदरावर चोरट्यांचा प्रचंड उपद्रव सुरू आहे. शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज देवूनही देखील लक्ष देण्यात आले नाही. अखेर डिझेलपंपावरील सीसीटीव्हीत कैद झालेले चोरटे, जमावासमोर चोरीची दिलेली कबुली, चोरट्यांचे छायाचित्रण इतकेच नव्हे तर चोरट्यांनी ज्या दुकानात तांबे, पितळेच्या वस्तू विकल्या त्या दुकानदाराचे कबुलीचा पेनड्राईव्ह आणि निवेदन राजिवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी सोसायटीने पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तातडीच्या तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
मासेमारी बंदी कालावधी १ जूनपासून सुरू होतो; परंतु १० मे पासूनच मच्छीमार नौका मिरकरवाडा बंदरात आणून उभ्या करण्याची प्रक्रिया सुरू होते. नौकांवरील साहित्य तांबे, पितळेच्या कड्यांसह शिसे असलेली जाळी व इतर साहित्य काढून ठेवण्यास प्रारंभ होतो. हे साहित्य बंदरावरील गोदामामध्ये ठेवले जाते. अशा कालावधीत दरवर्षी चोर्‍या होत होत्या; परंतु चोरटे सापडत नव्हते. राजीवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी सोसायटीच्या डिझेल पंपावरील पितळीची टाकी चोरणारे चोरटे येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले. या प्रकरणी या सोसायटीने २५ मे रोजी शहर पोलिसांकडे चोरीबाबत तक्रार अर्ज दिला.
सीसीटीव्हीत कैद झालेल्या ३ चोरट्यांना दुसर्‍याच दिवशी याच सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी पकडले. जमावाने सोसायटीच्या कार्यालयाच्या परिसरातून बाहेर नेऊन त्यांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. जमाव मारत असल्याची माहिती पोलिसांना मोबाईलवर फोन करून देण्यात आली. या संदर्भातील संभाषणही पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पेनड्राईव्हमध्ये आहे. पकडलेल्या चोरट्यांनी कोणाकोणाचे साहित्य चोरले याची माहिती मारहाण करणार्‍या जमावाला चोरानी दिली. ही माहिती मिळाल्यानंतर ज्यांनी चोरीच्या तक्रारी दिल्या नव्हत्या त्या मच्छीमारांनी रामआळीतील तांबे, पितळेच्या वस्तू विकणार्‍या दुकानातून आपल्या वस्तू परत घेतल्या. याबाबतची कबुली देतानाचे छायाचित्रणही पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पेनड्राईव्हमध्ये आहे. सहकारी सोसायटीने आपल्या डिझेल पंपावरील चोरीप्रकरणी २५ मे रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता; परंतु त्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नव्हती. अखेर याबाबत सोसायटीने पोलिस अधीक्षकांकडे निवेदन देऊन चोरट्यांनी केलेल्या चोरीबाबतची इत्थंभूत माहिती असणारा पेनड्राईव्हही दिला. त्यानंतर तपासाला गती आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64170 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top