वहिनीस मारहाणप्रकरणी मालवणात दिरावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वहिनीस मारहाणप्रकरणी मालवणात दिरावर गुन्हा
वहिनीस मारहाणप्रकरणी मालवणात दिरावर गुन्हा

वहिनीस मारहाणप्रकरणी मालवणात दिरावर गुन्हा

sakal_logo
By

वहिनीस मारहाणप्रकरणी
मालवणात दिरावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २ : शहरातील धुरीवाडा येथे दिराने वहिनीला धारधार वस्तूने दुखापत करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रिया राजेश पाटकर यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार प्रविण हनुमंत पाटकर याच्याविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सौ. रिया पाटकर या ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता बाजारातून काम करून धुरीवाडा येथील घरी गेल्या असता प्रविण पाटकर याने हे माझे घर आहे तुम्ही रहायचे नाही. तुम्ही या घरातून बाहेर पडा नाहीतर तुम्हाला मारून टाकणार असे सांगत शिविगाळ करून रिया यांच्या गळ्याला पकडले. तसेच धारधार वस्तूने रिया यांच्या हनुवटीवर मारून दुखापत केली. त्यावेळी प्रविण पाटकर मारहाण करेल या भितीने रिया या रेवतळे येथील माहेरी गेल्या. एक जूनला रिया यांचा मुलगा पंचम हा धुरीवाडा येथे कपडे आणण्यासाठी गेला असता प्रविण पाटकर याने पंचम याला तुम्हाला सर्वांना घरातून बाहेर काढणार व ठार मारणार अशी धमकी दिली. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64177 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top