रत्नागिरी-रुग्णवाहिका चालाकाचा उत्तरप्रदेशमध्ये अपघाती मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रुग्णवाहिका चालाकाचा उत्तरप्रदेशमध्ये अपघाती मृत्यू
रत्नागिरी-रुग्णवाहिका चालाकाचा उत्तरप्रदेशमध्ये अपघाती मृत्यू

रत्नागिरी-रुग्णवाहिका चालाकाचा उत्तरप्रदेशमध्ये अपघाती मृत्यू

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२p४०.jpg-KOP२२L२६१४७ बिहार ः अपघाग्रस्त रुग्णवाहिका.
------------
रुग्णवाहिकाचालकाचा
उत्तरप्रदेशात अपघाती मृत्यू
रत्नागिरी येथून बिहारला मृतदेह नेत असताना दुर्घटना
रत्नागिरी, ता. २ ः रत्नागिरी येथून बिहारला मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा गुरुवारी (ता. २) पहाटे चारच्या सुमारास मिर्जापूर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील रसैना गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील फिरोज अकबर पावसकर (वय ३८ रा. निवखोल) या तरुण चालकाचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असणाऱ्या तौफिक काझी (रा. सोमेश्वर) याला किरकोळ दुखापत झाली आहे.
रत्नागिरीपासून सुमारे १६०० किमी लांब हा अपघात झाल्याने शुक्रवारी (ता. ३) सायंकाळपर्यंत फिरोजचा मृतदेह रत्नागिरीत आणण्यात येणार आहे. उत्तरप्रदेशमधील मिर्जापूर जिल्ह्यातील रसैना गावाजवळ आज पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या रुग्णवाहिकेतून एक मृतदेह बिहार येथे नेण्यात येत असताना हा अपघात झाला. रुग्णवाहिकेवरील ताबा सुटून ती एका ट्रकवर आपटल्याचे समजते. या अपघातात एकूण ३ जण जखमी झाले. यातील जखमी रुग्णवाहिका चालक फिरोजचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयाबाहेर फिरोजची रुग्णवाहिका नेहमी सेवेसाठी असायची, अशी माहिती त्याच्या मित्रांकडून मिळाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64183 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top