कुडाळ तालुक्यात दमदार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ तालुक्यात दमदार पाऊस
कुडाळ तालुक्यात दमदार पाऊस

कुडाळ तालुक्यात दमदार पाऊस

sakal_logo
By

कुडाळ तालुक्यात
दमदार पाऊस
कुडाळ ः कुडाळ शहरासह तालुक्याच्या अन्य भागात गुरुवारी (ता. २) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वीजपुरवठाही खंडित झाला होता. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडली. पणदूर पंचक्रोशीत मेघगर्जनेसह पावसाने जोरदार सलामी दिली. पणदूर, अणाव, हुमरमळा, डिगस परिसरात सायंकाळी साडेसातपासून रात्री साडेआठपर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, विजेच्या लखलखाटासह तासभर जोरदार पाऊस पडत होता. पावसाने हवेत गारवा आला, तरी नागरिकांची मात्र धांदल उडाली. पांग्रड परिसरातही वादळी पाऊस झाला.
----------------------
सोनाली कदमचे
‘राज्यसेवे’त यश
कणकवली ः बेळणे खुर्द (ता. कणकवली) येथील सोनाली सुरेश कदम या अभियंता असणाऱ्या मुलीने राज्यसेवा परीक्षेत यश मिळविले. तिची सहायक प्रकल्प अधिकारी गट-ब या पदावर नियुक्ती झाली आहे. सोनालीचे शिक्षण येथील विद्यामंदिर हायस्कूल व कणकवली कॉलेज येथे झाले. आई-वडील दोघेही निवृत्त शिक्षक आहेत. तिने पनवेल येथे एमजीएम कॉलेजला बायोटेक्नॉलॉजी ही अभियांत्रिकी पदवी घेतली. तिने राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास पुणे येथे केला.
------------------
मळगावात सोमवारी
‘शिवराज्याभिषेक’
सावंतवाडी ः मळगाव येथील (कै.) उदय खानोलकर वाचन मंदिरच्या रमाकांत खानोलकर सभागृहात सोमवारी (ता. ६) सकाळी साडेदहाला शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा सरकारच्या धोरणानुसार करण्यात येत असून या कार्यक्रमास सर्व वाचक, हितचिंतक, वाचनप्रेमी; तसेच शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन (कै.) उदय खानोलकर वाचनालयाच्या संचालक मंडळाने केले आहे.
--
आनंद च्यारींचा
प्रामाणिकपणा
दोडामार्ग ः साटेली-भेडशी महेश बाळू धर्णे यांचे बाजारपेठेत हरवलेले पाकीट म्हावळिंगे (गोवा) येथील आनंद विष्णू च्यारी यांना सापडले. त्यांनी पाकिटातील ओळखपत्राच्या सहाय्याने धर्णे यांचा शोध घेऊन पाकीट परत केले. धर्णे यांचे मित्र प्रवीण धर्णे यांनी हे पाकीट स्वीकारले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64287 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top