कोतवडे येथे विकासकामांचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोतवडे येथे विकासकामांचे उद्घाटन
कोतवडे येथे विकासकामांचे उद्घाटन

कोतवडे येथे विकासकामांचे उद्घाटन

sakal_logo
By

rat3p11.jpg-
26334
रत्नागिरी : कोतवडे येथे गुरववाडी, तांबटवाडी, पेडणेकरवाडी करिता नवीन पंपसेट देण्यात आला. त्याचे लोकार्पण करताना सरपंच तुफील पटेल, संतोष बारगोडे आणि ग्रामस्थ.
--------------
कोतवडे येथे विकासकामांचे उद्घाटन
रत्नागिरी, ता. ३ : तालुक्यातील कोतवडे ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामे पूर्ण केली आहे. या कामांचे उद्घाटन सरपंच तुफील पटेल, उपसरपंच संतोष बारगोडे यांच्या हस्ते करण्यात आले. कोतवडे शेवडवाडी येथील जुन्या सार्वजनिक विहीर दुरुस्तीचे काम पंधराव्या वित्त आयोगातून पूर्ण करण्यात आले. या वेळी दिलीप सोमेश्वरकर, हरिश्चंद्र मयेकर, जयवंत मयेकर, गुरुप्रसाद मोहित, अभिजीत पकये, आर्यन मयेकर, हर्षल मयेकर, दुर्वांकुर मयेकर, रतन सोमेश्वरकर, आरती पकये, प्रणाली पकये, सीमा पकये, सुप्रिया मोहित, अस्मिता कुरटे, आरोही मोहित, मीनाक्षी पेंढारी, पूजा मयेकर, अंकिता भाटकर, मनाली मयेकर आदी उपस्थित होते. गुरववाडी, तांबटवाडी, पेडणेकरवाडीसाठी ग्रामपंचायतीकडून नवीन पंपसेट देण्यात आला. गावामध्ये सध्या एकूण १८ नळपाणी योजना चालू आहेत. पैकी गुरववाडीची योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालविली जाते. नव्याने सुरू केलेल्या नळपाणी योजनेसाठी ग्रामपंचायतने नवीन पंप पंधराव्या वित्त आयोगातून देऊ केला. या वेळी दिया कांबळे, माजी उपसरपंच स्वप्निल मयेकर, जनार्दन पेडणेकर, किशोर पेडणेकर, रमेश कोवळे, विजय वैद्य उपस्थित होते. कोतवडे-वारेवाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या लोखंडी जाळीचे उद्घाटन सरपंचांच्या हस्ते झाले. या वेळी ज्योती वारेकर, राजन वारेकर, दीक्षांत पाटील, जगदीश वारेकर, अनंत वारेकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64301 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top