कोंढेतड, तुळसवडेत पाणी योजनेच्या साठवण टाक्यांसाठी जागेची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंढेतड, तुळसवडेत पाणी योजनेच्या साठवण टाक्यांसाठी जागेची पाहणी
कोंढेतड, तुळसवडेत पाणी योजनेच्या साठवण टाक्यांसाठी जागेची पाहणी

कोंढेतड, तुळसवडेत पाणी योजनेच्या साठवण टाक्यांसाठी जागेची पाहणी

sakal_logo
By

rat3p5.jpg
26328
राजापूरः कोंढेतड येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी.
-rat3p6.jpg ः
26329
तुळसवडेच्या सरपंच आडिवरेकर यांच्यासह ग्रामस्थांशी चर्चा करताना जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी.
---------------

पाणी योजना टाक्यांसाठी जागेची पाहणी
कोंढेतड, तुळसवडेत साठवण टाकी ; पांगरे बुद्रूक धरणातून 14 गावांना पाणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. 3 ः तालुक्यातील पांगरे बुद्रूक येथील धरणाच्या पाणीसाठ्यावर चौदा गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेसाठी साठवण टाकी बसवण्यासह अन्य कामांसाठी आवश्यक असलेल्या जागांची जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोंढेतड आणि तुळसवडे येथे पाहणी केली. या वेळी तुळसवडेच्या सरपंच आडिवरेकर, कोंढेतडचे माजी सरपंच अरविंद लांजेकर आदी उपस्थित होते.
तालुक्यातील पांगरे बुद्रुक येथे धरण बांधण्यात आले असून त्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. या पाणीसाठ्याचा उपयोग करत परिसरातील गावांमधील वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याच्या अनुषंगाने नळपाणी योजना राबवण्यात येत आहे. त्याचा फायदा त्या परिसरातील चौदा गावांना होणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्या ज्या गावांना या नळपाणी योजनेचा लाभ होणार आहे, त्या त्या गावांमध्ये बसवण्यात येणाऱ्या साठवण टाक्यांसाठी लागणाऱ्या जागांसह अन्य कामांसाठी लागणारी जागा संबंधित ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यायची आहे. त्या अनुषंगाने जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुळसवडे आणि कोंढेतड येथे भेट दिली.
तुळसवडे-पळसमकरवाडी येथे जीवन प्राधिकरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुर्वे, सहाय्यक अभियंता जयस्वाल, मालुसरे यांनी सरपंच आडिवरेकर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये जागेची पाहणी केली. कोंढेतड येथे साठवण टाकीसाठी धोपटेवेडी व कोतरेवाडी येथील जागेची पाहणी केली. या ठिकाणी साठवण टाक्या उभारण्याच्या अनुषंगाने लवकरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64303 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top