घाणेखुंटमधील व्यापारी सर्व्हिस रोडच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाणेखुंटमधील व्यापारी सर्व्हिस रोडच्या प्रतीक्षेत
घाणेखुंटमधील व्यापारी सर्व्हिस रोडच्या प्रतीक्षेत

घाणेखुंटमधील व्यापारी सर्व्हिस रोडच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

घाणेखुंटमध्ये रस्ता खाली, बाजारपेठ वर
सर्व्हिस रोडच्या प्रतिक्षेत ; एसटीची सेवाही ठप्प
खेड, ता. २ः चौपदरीकरणाच्या कामात तब्बल २५ दिवसानंतरही सर्व्हिस रोडचे काम जैसे थे असून, येथील लोटे घाणेखुंट बाजारपेठेतील व्यापारी या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. महामार्गावरील अंडरपास अडचणींचा ठरत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक व्यापाऱ्यांमधून उमटत आहेत. येथील अंडरपास रस्त्याची उंची कायम करण्यासाठी गावातील मुख्य रस्त्याची पाच फुटाहून अधिक खोदाई करावी लागत आहे. त्यामुळे रस्ता खाली व बाजारपेठ वर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या बाजारपेठेतील दक्षिण-उत्तर मार्ग बंद झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामात गेल्या अनेक दिवसांपासून खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंट येथील काम रेंगाळले आहे. लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीमुळे हे ठिकाण सततच्या वर्दळीने गजबजलेले असते. चिपळूण व खेड बाजारपेठेला पर्यायी बाजारपेठ म्हणून लोटे घाणेखुंटची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे परप्रांतीयांसह स्थानिकांची नेहमीच येथे रेलचेल सुरू असते. चौपदरीकरणाचा त्रास बाजारपेठेला होऊ नये म्हणून दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथे उशिराने अंडरपास रस्ता तयार करण्याचे काम कल्याण टोलवेज या ठेकेदाराकडून करण्यात आले; मात्र, स्थानिक बाजारपेठेतील रस्त्याची उंची व महामार्गावरील अंडरपास रस्त्याची उंची यात बरीच तफावत आहे. परिणामी चौपदरीकरणाचे काम केल्यानंतर येथील अंडरपास रस्त्याची उंची कायम करण्यासाठी गावातील मुख्य रस्त्याची पाच फुटाहून अधिक खोदाई करावी लागत आहे. त्यामुळे रस्ता खाली व बाजारपेठ वर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर काही स्थानिक ग्रामस्थ, रहिवासी व व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. आता याला काहीच पर्याय नसल्याने ठेकेदाराकडून हे काम थांबवले गेले आहे. काम थांबवून तब्बल २५ दिवस उलटून गेले आहेत. खोदाई करताना रस्त्याची काढलेली माती अंडरपासच्या तोंडावरच ठेवली गेली आहे. त्यामुळे या बाजारपेठेतील दक्षिण-उत्तर मार्ग बंद झाला आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. पावसाळा काहीच दिवसांवर येऊन ठेपल्याने व्यापारी चिंतेत सापडले आहेत. याच मार्गावरून घाणेखुंट, कोतवली, सोनगाव मार्गावरील एसटीची सेवाही ठप्प झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64318 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top