
महिलांच्या यशोगाथांवर लघुपट स्पर्धा
महिलांच्या यशोगाथांवर
लघुपट स्पर्धा
ओरोस, ता. ३ ः उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सिंधुदुर्ग अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरूपात राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफीत निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन १ ते ३० जून या कालावधीत केले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी व्यवसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडिओ निर्माते व यूट्यूब ब्लॉगर यांना सहभागी होता येणार आहे. यात राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक ३ लाख व सन्मानचिन्ह, द्वितीय २ लाख व सन्मानचिन्ह, तृतीय १ लाख तसेच सन्मानचिन्ह आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. स्पर्धेतील उत्तेजनार्थ क्रमांकाला ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह सोबतच प्रमाणपत्र लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात २०११ पासून इंटेनसिव्ह पद्धतीने दिनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद या नावाने अंमलबजावणी केली जात असून महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबाच्या जीवनमानात फरक पडला आहे. या यशोगाथाना दृकश्राव्य माध्यमातून चित्रित करण्यासाठी राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफीत निर्मिती स्पर्धा १ ते ३० जून दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64349 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..