खलांतर परिसरात निलगायीचा वावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खलांतर परिसरात निलगायीचा वावर
खलांतर परिसरात निलगायीचा वावर

खलांतर परिसरात निलगायीचा वावर

sakal_logo
By

खलांतर परिसरात
निलगायीचा वावर
कनेडी ः येथून जवळच असलेल्या भिरवंडे खलांतर येथील सह्याद्री डोंगर भागात निलगायीची वावर वाढला आहे. स्थानिक या निलगायीला सांभर या नावने ओळखतात. निलगायी दाजीपूर अभयारण्यातून सह्याद्री पट्टातील शेतात उतरतात. भातपेरणी नंतर वाढलेली भाताची रोपे निलगाय खातात. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. भात पेरणी जवळ आल्याने या रानटी जनावरांकडून शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वनविभागाने या सांबर प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
---------
कळसुलीत
भातपेरणी
कणकवली ः कळसुली परिसरात पावासाने हजेरी लावल्याने भातपेरणीला सुरूवात झाली आहे. उन्हाळी शेतीनंतर आता खरीप हंगामातील भात पेरणीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे भातबियाने आणि खते खरेदीला सुरूवात झाली आहे. यंदा जूनच्या पहील्या आठवड्यात पावसाचे मान्सुनचे आगमन झाल्याने शेतकरी समाधानी आहे. त्यामुळे संकरीत आणि सुधारीत असलेली १३० ते १४० दिवसात तयार होणारे भात बियाने खरेदीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.
--
फोंडाघाटला
पावसाने झोडपले
फोंडाघाट ः येथील परिसरात काल सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे खरीप हंगामातील भात पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांनी आज सकाळी भात पेरणीला सुरुवात केली. पावसामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. उकाड्यामुळे हैरान झालेल्या नागरिकांना पावासाने दिला मिळाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64376 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top