आदीवासी, कातकरींना देवगडात दाखल्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदीवासी, कातकरींना
देवगडात दाखल्यांचे वाटप
आदीवासी, कातकरींना देवगडात दाखल्यांचे वाटप

आदीवासी, कातकरींना देवगडात दाखल्यांचे वाटप

sakal_logo
By

L26423

- देवगड ः येथील तहसीलदार कार्यालयात लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर उपस्थित होते. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

आदीवासी, कातकरींना
देवगडात दाखल्यांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ ः तालुक्यातील कातकरी, आदीवासी समाजातील नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. येथील तहसीलदार कार्यालयात लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यासाठी शिबीर घेण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर उपस्थित होते.
तालुक्यातील कातकरी, आदीवासी समाजातील नागरिकांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात शिबीर घेण्यात आले. सर्वांना एकाचवेळी एकाच ठिकाणी दाखले उपलब्ध व्हावेत यासाठी याचे आयोजन केले होते. यामध्ये जातीचा दाखला, भुमिहिन दाखला, रहिवाशी दाखला आदी दाखल्यांचा समावेश होता. तालुक्यातील मुणगे, कुणकेश्‍वर, शिरगांव, मोंड, सौंदाळे आदी भागातील कातकरी, आदीवासी समाजातील बांधव उपस्थित होते. दाखले मिळवण्यासाठी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. यामध्ये महिलांचाही समावेश होता. शिबीरात जातीचे दाखले, भुमिहिन दाखले तसेच रहिवाशी दाखले वितरित करण्यात आल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली. यावेळी सोशित मुक्ती अभियान संस्थेचे अध्यक्ष उदय आईर तसेच महसूल कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, सायंकाळपर्यंत शिबीर सुरू होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64439 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top