रत्नागिरी ः प्रभागरचना 4 पालिका निवडणुका कायम हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः  प्रभागरचना 4 पालिका निवडणुका कायम हवी
रत्नागिरी ः प्रभागरचना 4 पालिका निवडणुका कायम हवी

रत्नागिरी ः प्रभागरचना 4 पालिका निवडणुका कायम हवी

sakal_logo
By

प्रभागरचना चार पालिका निवडणुकांत कायम ठेवा

अमेय परुळेकरांची मागणी ; समान संधी आवश्यक

रत्नागिरी, ता. ३ ः पालिका प्रभागरचनेमध्ये होणाऱ्या बदलाबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांनी हरकत घेतली. एकदा प्रभागरचना केली की, ती किमान पुढील ४ पालिका निवडणुकात कायम ठेवा. जेणेकरून मागासवर्ग, सर्वसाधारण वर्गाच्या चारही प्रकारच्या नगरसेवक निवडणूक उमेदवारास समान प्रभागात निवडणूक लढवण्याची संधी मिळेल, त्यामुळे भेदभाव होणार नाही, अशी मागणी परुळेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्यासमोर केली.
जिल्हाधिकारी यांच्याकडे पालिकेच्या प्रभाग रचनेबद्दलच्या हरकत अर्जावर नुकतीच सुनावणी झाली. त्यामध्ये रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांनीदेखील हरकत अर्ज दिला होता. त्यावर त्यांनी २० मे २०२२ ला जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्यासमोर सुनावणी झाली. सलग तिसऱ्या वेळेला पालिकेच्या प्रभाग रचनांमध्ये बदलण्यात आली. गेल्या वेळी २ वॉर्डचा एक प्रभाग व त्या आधी ४ वॉर्डचा एक प्रभाग होता. आधीच्या २०१६च्या निवडणुकीत उमेदवाराला २ वॉर्डमध्ये प्रचार करायला लागला व त्या आधीच्या निवडणुकीत नगरसेवक उमेदवाराला ४ वॉर्डमध्ये प्रचार करायला लागला. हा भेदभाव कशासाठी, असा सवाल अमेय परुळेकर यांनी सुनावणी वेळी उपस्थित केला. एकदा प्रभागरचना केली की ती किमान पुढील ४ पालिका निवडणुका कायम ठेवायला हवी. त्यामुळे मागासवर्ग, सर्वसाधारण वर्गाच्या चारही प्रकारच्या नगरसेवक निवडणूक उमेदवारास समान प्रभागात समान निवडणूक लढवण्याची व समान प्रभागात प्रचार करण्याची समान संधी मिळेल. त्यामुळे भेदभाव होणार नाही, अशी मागणी परुळेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64475 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top