रत्नागिरी ः कोरोना लसीसाठी हर घर दस्तक मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः कोरोना लसीसाठी हर घर दस्तक मोहीम
रत्नागिरी ः कोरोना लसीसाठी हर घर दस्तक मोहीम

रत्नागिरी ः कोरोना लसीसाठी हर घर दस्तक मोहीम

sakal_logo
By

कोरोना लसीसाठी हर घर दस्तक मोहीम
आरोग्य विभाग; १ जून ते ३१ जुलै कालावधी

रत्नागिरी, ता. ३ ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. त्यासाठी तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये हर घर दस्तक मोहीम २ यशस्वीपणे राबवण्यासाठी आरोग्य विभागाकडून पावले उचलण्यात आली आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या सूचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत हर घर दस्तक मोहीम २ राबवण्यात येत आहे. कोरोनापासून बचावासाठी स्वतः लस घेऊन, कुटुंबीयांभोवती सुरक्षा कवच तयार करण्यात येणार आहे. शासनाकडून कोविड लसीचा पुरवठा नियमित होत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाने होणारा प्रादुर्भाव कमी व्हावा व कोविड लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी ही मोहीम २ राबवली जात आहे. जिल्ह्यात कोविड रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोविड लसीकरण हे फार महत्वाचे आहे. प्रत्येक गावातील व शहरी भागातील नागरिकात व्यापक प्रमाणात जनजागृती करून व जनतेचा जनसहभाग मिळवून कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करून व योग्यवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. लसीकरणात १०० टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस पूर्ण होईल याकडे लक्ष देऊन दुसरा डोस पूर्ण करावा. त्यानंतर ज्या लाभार्थ्यांचा बूस्टर डोस राहिला असेल तो प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे.
----------------

१९ लाख ३३ हजार मात्रांचे वितरण
जिल्ह्यात आतापर्यंत पहिल्या डोसची १० लाख ५५ हजार ४८४ मात्रा देण्यात आली असून हे प्रमाण ९७.५६ टक्के आहे. दुसर्‍या डोसची मात्रा ८ लाख ९८ हजार ३११ असून हे प्रमाण ८३.०३ टक्के आहे. आतापर्यंत एकूण १९ लाख ३३ हजार ७९३ मात्रा देण्यात आल्या आहेत. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना पहिल्या डोसची ५२ हजार ४१४ मात्रा देण्यात आली तर दुसर्‍या डोसची ४० हजार ८८३ मात्रा दिली आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना पहिला डोस ३१ हजार ९५ जणांना तर दुसरा डोस १४ हजार ३८९ जणांनी घेतला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64488 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top