पॉलिशच्या बहाण्याने 5 तोळे दागिन्यावर डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॉलिशच्या बहाण्याने 5 तोळे दागिन्यावर डल्ला
पॉलिशच्या बहाण्याने 5 तोळे दागिन्यावर डल्ला

पॉलिशच्या बहाण्याने 5 तोळे दागिन्यावर डल्ला

sakal_logo
By

पॉलिशच्या बहाण्याने
पाच तोळे दागिन्यावर डल्ला
चिपळुणातील प्रकार ; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
चिपळूण, ता. ३ः शहरातील एनरॉन बायपास रोडवरील अम्मा व्हिला या इमारतीत सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून दोन तरुणांनी पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना गुरुवारी (ता. २) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. हे चोरटे अगदी रूबाबदार कपडे घालून आले होते. त्यांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ताबिश शेख यांनी माहिती दिल्यानुसार, काल सकाळी ते त्याची आई रहिमा शेख व वडील असे तिघे घरी होते. ताबिश वरच्या माळ्यावर आपल्या ऑनलाइन कामाची आवराआवर करत होते.
दरम्यान, खाली दोन तरुण अगदी चांगले कपडे घालून आले होते. आम्ही दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत सुरवातीला दोन-तीन दागिने पॉलिश करून दिले व विश्वास संपादन केला. काही वेळाने त्यांनी रहिमा शेख यांची सोन्याची चेन व हातातील एक बांगडी पॉलिश केली व दहा मिनिटे त्याला हात लावू नका, असे सांगितले. दरम्यान, ४.८ तोळ्याचे खरे दागिने घेऊन त्यांनी तेथून हळूच पोबारा केला. थोड्या वेळाने काहीच कसे झाले नाही म्हणून दागिने पाहिले असता ते दागिने खोटे असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी ताबिशला हाक मारली व त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्या तरुणांचा शोध न लागल्याने मग त्यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत ताबिश शेख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64503 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top