
आडवलीत ट्रॅक्टर उलटून प्रौढाचा मृत्यू
ट्रॅक्टर उलटून प्रौढाचा मृत्यू
आडवलीत अपघात; चालक गंभीर जखमी
राजापूर, ता. ३ ः तालुक्यातील आडवली येथे ट्रॅक्टर उलटून विजापूर (कर्नाटक) येथील जयराम रामसिंग जाधव (वय ५५) याचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता. २) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये ट्रॅक्टर चालक रामेश्वरलाल गाडरी हा जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.
राजापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आडवली येथे रस्त्याचे काम सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी चालक रामेश्वरलाल गाडरीसह जयराम रामसिंग जाधव (रा. विजापूर, कर्नाटक) हे दोघेजण आपले काम आटोपून ट्रॅक्टरने (आरजे-०९-आरए-६५७७) घरी निघाले होते. जाधव हे चालकाच्या शेजारी बसले होते. आडवली रस्त्यावरील वळणावर ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. त्यामध्ये चालकाच्या बाजूला बसलेले जाधव खाली पडले आणि ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरचा चालक गाडरी जखमी झाला असून अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकाँस्टेबल तिवरेकर आणि सहकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातासह मृतदेहाचा पंचनामा करुन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताची पोलिसामध्ये नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस हेडकाँस्टेबल तिवरेकर करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64504 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..