संशयितरित्या फिरणाऱ्या युवतीसह युवक माडखोलात ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संशयितरित्या फिरणाऱ्या युवतीसह
युवक माडखोलात ताब्यात
संशयितरित्या फिरणाऱ्या युवतीसह युवक माडखोलात ताब्यात

संशयितरित्या फिरणाऱ्या युवतीसह युवक माडखोलात ताब्यात

sakal_logo
By

संशयित युवक - युवती
माडखोल येथे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः माडखोल दत्त मंदिर परिसरामध्ये संशयितरित्या आढळलेल्या एका अल्पवयीन युवतीसह युवकाला सावंतवाडी पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतले. त्यांना मुस्कान मोहिमेअंतर्गत बाल न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नातेवाईकांच्या ताब्यात दिले. संबंधित दोघेही फिरण्यासाठी घरातून बाहेर पडले होते, असे तपासात पुढे आले.
अधिक माहिती अशी की, संबंधित मुलगी ही परजिल्ह्यातील आहे. ती मित्रांसोबत फिरण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. माडखोल-धवडकी येथील दत्त मंदिर परिसरात ती संशयास्पद आढळल्याने येथील नागरिकांनी पोलिसांना कल्पना दिली. पोलिस उपनिरीक्षक आनंद यशवंते, डी. व्ही. नाईक, ज्योती दुधवडकर, जी. जी. तामाणेकर यांनी घटनास्थळी जात दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची चौकशी केली असता ती मुलगी अल्पवयीन असल्याचे समजले तर संबधित युवक हा विवाहीत असल्याचे उघड झाले. आम्ही फिरायला आल्याचे त्यांनी सांगितले. युवती ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी ‘मुस्कान’ मोहिमेअंतर्गत तिला येथील बाल न्याय मंडळापुढे हजर केले असता त्यांनी दिलेल्या आदेशावरून तिला तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोघांच्याही नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावून समज देत ताब्यात दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64509 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top