वायरी-गर्देरोड परिसरात सडलेल्या स्थितीत मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायरी-गर्देरोड परिसरात सडलेल्या स्थितीत मृतदेह
वायरी-गर्देरोड परिसरात सडलेल्या स्थितीत मृतदेह

वायरी-गर्देरोड परिसरात सडलेल्या स्थितीत मृतदेह

sakal_logo
By

26498
वायरी ः येथे घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस कर्मचारी. सोबत वैद्यकीय कर्मचारी.

वायरी-गर्देरोड परिसरात
सडलेल्या स्थितीत मृतदेह

मालवण, ता. ३ : शहरातील वायरी गर्देरोड मार्गावर असलेल्या एका बंद घराच्या बाहेरील ओट्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळला. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय यादव, उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे, विलास टेंबुलकर हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या स्थितीत होता तसेच दुर्गंधी पसरली होती.
माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, संमेश परब, संतोष लुडबे, तृप्ती मयेकर, जयमाला मयेकर, ढोले बाबू यासह स्थानिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. ढोले बाबू, राजू वराडकर व सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, त्या ठिकाणी कोल्ड स्टोअरेज व्यवस्था बंद असल्याने विच्छेदन करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मृतदेह अनोळखी व्यक्तीचा सुमारे ४५, ५० वयोगटातील आहे. मृतदेहाला १५ दिवस कालावधी उलटला असण्याची शक्यता आहे. मृतदेहाचा काही भाग कुत्र्यांनी खाल्ला होता. मृत व्यक्ती त्या ठिकाणी झोपायला येत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान, परिसरातील कोणीही व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद नाही. पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, मृतदेह उचलण्यासाठी येथील पालिकेला संपर्क साधला असता कर्मचारी नसल्याचे सांगण्यात आले. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला असता कोल्ड स्टोअरेज व्यवस्था बंद असल्याने माजी उपनगराध्यक्ष राजू वराडकर यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64552 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top