चिपळूण ः पर्यावरणाच्या गोष्टी कृतीमध्ये उतरवण्याची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः पर्यावरणाच्या गोष्टी कृतीमध्ये उतरवण्याची गरज
चिपळूण ः पर्यावरणाच्या गोष्टी कृतीमध्ये उतरवण्याची गरज

चिपळूण ः पर्यावरणाच्या गोष्टी कृतीमध्ये उतरवण्याची गरज

sakal_logo
By

पर्यावरण दिन विशेषः लोगो
...
rat4p11.jpg
26541
-जावेद दलवाई
...
चिपळूण पालिकेने उचलावे प्लास्टिक बंदीचे पाऊल

जावेद दलवाई; पर्यावरण रक्षण कृतीत उतरवणे आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः संत तुकारामांनी ''वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे'' या शब्दांत मानवाचे निसर्गाशी असलेले दृढ नाते सांगितले होते. ज्या दिवशी पुस्तकात असलेल्या पर्यावरणासंबंधीच्या या गोष्टी आपण कृतीमध्ये उतरवू, त्याच दिवशी आपणास पर्यावरण दिन साजरा केल्याचे समाधान मिळू शकेल, असे मत क्रीडाई चिपळूणचे माजी अध्यक्ष जावेद दलवाई यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले.
ते म्हणाले, भूप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण होणार नाही, यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपण निसर्गाला जपले तरच निसर्ग आपणास जपणार आहे. ही पृथ्वी जशी माणसांची आहे, तशीच ती वृक्ष, पशु, पक्षी इत्यादींचीही आहे. प्राचीन कालीही आपल्या भारतातील ऋषी-मुनींनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले होते. शहराचे पर्यावरणच बिघडू द्यायचे नसेल, महापूर आणि इतर समस्येतून मुक्त व्हायचे असेल तर प्लास्टिक बंदी गरजेची आहे. पालिकेने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्याची गरज आहे.
मध्यंतरी सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केली. विशेष म्हणजे या प्लास्टिक बंदी घोषणेचे लोकांनी उत्स्फूर्त असे स्वागत केले. दंडाच्या भीतीपेक्षा लोकांना प्लास्टिक भस्मासूराची जास्त चिंता वाटली होती. सर्वसामान्य लोकांनी स्वत:हून प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद केले. त्यांनी कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवातही केली. भाजी, केळी विकणाऱ्यांनीही प्लास्टिकच्या पिशव्या देणे बंद केले होते. तपासनीसांनी प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांविरुद्ध दंडाची कारवाईही सुरू केली होती. प्रसारमाध्यमातून येणाऱ्या माहितीमुळे शहरांप्रमाणे अगदी ग्रामीण भागातही प्लास्टिक बंदी पाळली जाऊ लागली होती. परंतु मध्यंतरी काय झाले, कोण जाणे, सरकारी आदेशाची कारवाई थंडावली. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध करण्यात येणारी दंडाची कारवाईही थंड झाली. भाजीविक्रेत्यांनी पुन्हा प्लास्टिक पिशव्या वापरणे सुरू केले. कारवाई थंड झाल्याने त्यांच्या मनात भीती उरली नाही. वाईट याचेच वाटते की पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी सुरू झालेली ही विशेष मोहीम थंडावली. कायदा मोडण्याचे काहीच वाटेनासे झाले. प्लास्टिक बंदीचा केवळ एक निव्वळ फार्स ठरला. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार चालूच राहणार आहेत. पावसाळ्यातील धोका टाळण्यासाठी पालिकेने धोकादायक वृक्ष तोडली आहे. मात्र, पावसाळ्यात सार्वजनिक ठिकाणी नवीन झाडे लावणे आवश्यक आहे. शहरातील प्रत्येक भागातील नगरसेवकांनी तसेच गृहनिर्माण संस्थांनी शोभिवंत झाडे न लावता सावली देणारी झाडे लावली पाहिजेत.
............
कोट
सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून पर्यावरण समस्यांकडे अधिक जागरुकपणे पाहणे आणि या चळवळीत सर्वांना सामील करून घेऊन आपले भविष्य सुरक्षित व समृद्ध करण्याचा प्रयत्न करणे या हेतूने हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असतो. पर्यावरणाचे रक्षण करणे ही एक सवयच झाली पाहिजे. यासाठी समाज प्रबोधन सातत्याने केले जाण्याची जरूरी आहे. समाज प्रबोधन केले की काही उद्दीष्टे साध्य होतात.
- जावेद दलवाई चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64626 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top