साटेलीतील वृत्तपत्र विक्रेते अब्दुलगनी खतीब यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साटेलीतील वृत्तपत्र विक्रेते अब्दुलगनी खतीब यांचे निधन
साटेलीतील वृत्तपत्र विक्रेते अब्दुलगनी खतीब यांचे निधन

साटेलीतील वृत्तपत्र विक्रेते अब्दुलगनी खतीब यांचे निधन

sakal_logo
By

26557
अब्दुलगनी खतीब

साटेलीतील वृत्तपत्र विक्रेते
अब्दुलगनी खतीब यांचे निधन
साटेली भेडशी, ता. ४ ः येथील वृत्तपत्र विक्रेते आणि प्रतिष्ठित नागरिक अब्दुलगनी हुसेन खतीब (वय ८३) यांचे शुक्रवारी (ता. ३) निधन झाले. साटेली-आवाडे येथील दफनभूमीत शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
येथील बाजारपेठेत १९८१ पासून ते वृत्तपत्र विक्रेते म्हणून काम करायचे. तसेच इलेक्ट्रिशियन म्हणूनही त्यांची ओळख होती. मांगेलीसारख्या अतिदुर्गम गावात जात त्यांनी वीजजोडणी देऊन अनेक अंधारलेली गावे आणि घरे प्रकाशाने उजळवून टाकण्याचे काम केले आहे. सामाजिक कार्याचा पिंड असलेले अब्दुलगनी म्हणूनच सगळ्यांना आपलेसे वाटायचे. त्यांचा मित्र परिवार आणि लोकसंग्रह खूप मोठा होता. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष आणि येथील वृत्तपत्र विक्रेते जवाद हुसेन तथा बाबा खतीब आणि माणगाव शाळा क्र. १ मधील शिक्षक जियाउद्दीन खतीब यांचे ते वडील होत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64649 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top