दिव्यांगांच्या मेळाव्यात व्हिल चेअरचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांच्या मेळाव्यात व्हिल चेअरचे वाटप
दिव्यांगांच्या मेळाव्यात व्हिल चेअरचे वाटप

दिव्यांगांच्या मेळाव्यात व्हिल चेअरचे वाटप

sakal_logo
By

rat4p1.jpg
L26530
- गुहागर : दिव्यांग लाभार्थ्यांना व्हिलचेअर देताना मान्यवर
...
दिव्यांगांच्या मेळाव्यात व्हिल चेअरचे वाटप
गुहागर नगरपंचायती उपक्रम; २३ जणांना धनादेश, विविध योजनांबाबत मार्गदर्शन
गुहागर, ता. ५ : नगरपंचायतीतर्फे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात २ दिव्यांगाना व्हिल चेअर आणि २३ दिव्यांगांना धनादेशाचे वाटप केले. या मेळाव्यामध्ये नगरपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना आणि बचत गटाचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. गुहागर शहरातील भंडारी भवन येथे हा मेळावा झाला.
नगरपंचायतीला प्रत्येक आर्थिक वर्षात स्वनिधीमधील ५ टक्के रक्कम दिव्यांगांवर खर्च करावी लागते. आर्थिक वर्ष २०२१ -२०२२ मधील ८५ हजार १०० रुपयांचा निधी गुहागर नगरपंचायतीला दिव्यांगांसाठी खर्च करायचा होता. त्यासाठी नगरपंचायतीने अर्ज मागविले होते. प्राप्त अर्जांची छाननी जिल्हास्तरावर झाली. त्यातून गुहागर नगरपंचायतीमधील २३ दिव्यांग व्यक्ती लाभार्थी ठरल्या. या सर्वांना प्रत्येकी ३७०० रुपयांचा धनादेश दिव्यांग मेळाव्यात सन्मानपूर्वक देण्यात आला.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्रतर्फे दिव्यांग सहाय्य योजना (ADIP Scheme) राबविण्यात आली होती. या योजनेमधून गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील उमेश सुधाकर माचिवले वरचापाट दुर्गादेवीवाडी आणि चंद्रशेखर शंकर लोखंडे जांगळेवाडी या दिव्यांगाना व्हिलचेअर मंजूर झाल्या होत्या. नगरपंचायतीने आयोजित केलेल्या दिव्यांग मेळाव्यात या व्हिलचेअर त्यांना देण्यात आल्या.
या मेळाव्यात शरीफ मुजावर, चिपळूण यांनी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगजनांना कोणत्या योजनांचा लाभ घेता येतो, याची माहिती दिली. तर सुचिता आंबोकर यांनी गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील दिव्यांगजनांना बचत गट स्थापन करण्याची विनंती केली. तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी नगरपंचायत क्षेत्रातील अपंग कार्यकर्त्यांनी नवीन समिती स्थापन करावी, असे आवाहन केले.
मेळाव्याला तहसीलदार प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्षा प्रणिता साटले, भाजपचे गटप्रमुख उमेश भोसले, नगरसेविका स्नेहा भागडे, सौ. सांगळे, नगरसेवक माधव साटले, समिर घाणेकर, गजानन वेल्हाळ, संजय मालप, संगीता भाटकर, वरिष्ठ अधिकारी पेढांबकर आदी उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी नगरपंचायतीचे कर्मचारी संदेश असगोलकर, जनार्दन साटले, सुनिल नवजेकर, महेश कदम, समर्थ भोसले व ओंकार लोखंडे यांनी मेहनत घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64661 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top