
सार्वजनिक शौचालयामुळे पसरली दुर्गंधी
rat4p2.jpg
L26531
देवरुखः पोलिस वसाहत येथील सार्वजनिक शौचालय इमारत.
...
सार्वजनिक शौचालयाचा पोलिस वसाहतीला त्रास
पसरली दुर्गंधी; देवरूख नगरपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
देवरुख, ता.४ः येथील पोलिस वसाहतीच्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यात येत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे देवरुख नगरपंचायतीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
देवरुख तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. सर्व शासकीय कार्यालये, बँका, बाजारपेठ या ठिकाणी असल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज शेकडो नागरिक देवरुखात येतात. देवरुख बस स्थानक वगळता अन्य कोठेही सार्वजनिक शौचालय नाही.
तहसील कार्यालयाची नूतन इमारत उभारताना समोरील सार्वजनिक शौचालय इमारत जमीनदोस्त करण्यात आली. तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आदी परिसरात सार्वजनिक शौचालय इमारतीची आवश्यकता होती. ही बाब हेरून देवरूख नगरपंचायती कडून पोलीस वसाहत या ठिकाणी सार्वजनिक शौचालय सुरू करण्यात आले आहे. शौचालयात वारंवार पाणी नसणे तसेच शौचालयाची वेळेवर साफसफाई करण्यात येत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरपंचायतीने साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव फलकावर लावले आहे. मात्र, शौचालयाची साफसफाई होते की नाही याकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. नागरिकांनी हा प्रकार नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या समस्येकडे देवरूख नगरपंचायत ने लक्ष देऊन शौचालयाची साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.
.........................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64662 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..