
कणकवली : फोंडाघाट इमारत लोकार्पण
26595
फोंडाघाट : येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करताना आमदार नीतेश राणे.
फोंडाघाट ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन
नीतेश राणेंची उपस्थिती; गावाचे उत्पन्न वाढविण्याचे आवाहन
कणकवली, ता. ४ : फोंडाघाट (ता. कणकवली) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटराव पवार यांच्यासारखी दूरदृष्टी दाखवून फोंडाघाट गावाचे दरडोई उत्पन्न वाढवा, असे आवाहन केले.
ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, सरपंच संतोष आग्रे, उपसरपंच सुदेश लाड, माजी उपसभापती तुळशीदास रावराणे, माजी उपसभापती बबन हळदिवे, राजन चिके, सुजाता हळदिवे, माजी सरपंच भाई भालेकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राणे म्हणाले, ‘सिंधुदुर्गात कोकमची उलाढाल चारशे कोटींची आहे. या कोकम उद्योगाचे केंद्र फोंडाघाट परिसरात झाले. शेकडो जणांना रोजगार मिळू शकतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उद्योग खात्याच्या माध्यमातून कोकम उद्योगाचे क्लस्टर तयार करण्याचा मानस आहे. ग्रामपंचायत इमारतीमध्ये येणारा प्रत्येक ग्रामस्थ समाधानाने माघारी जायला हवा. तसेच एखाद्याचे काम झाले नाही तरी त्यांच्याशी सौजन्याने आणि विनम्रतेने वागा,’ असे आवाहनही राणे यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64695 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..