सावंतवाडीत नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद
सावंतवाडीत नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद

सावंतवाडीत नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद

sakal_logo
By

26608
सावंतवाडी ः नेत्र तपासणी शिबिर उद्‍घाटनप्रसंगी साई हवालदार, राजेश घाटवळ, डॉ. विनया बाड, आबा कशाळीकर आदी.

सावंतवाडीत नेत्रचिकित्सा शिबिराला प्रतिसाद

रोटरीचा पुढाकार; सहभागी ३६० लाभार्थींना चष्मे देणार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः येथील शहरात रोटरी क्लब चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ४० वर्षांवरील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ३६० जणांनी नोंदणी करून सेवेचा लाभ घेतला. मोफत तपासणीत सहभागी झालेल्यांना दोन महिन्यांत चष्मा वाटप करण्यात येणार आहे, असे रोटरीच्या वतीने सांगण्यात आले.
रोटरी क्लब चॅरिटेबल ट्रस्ट, व्हिजन आरएक्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात ४० वर्षांवरील व्यक्तींची तपासणी केली. रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ, रोटरीचे अध्यक्ष शेखर मेहता, संचालक गौरेश धोंड यांच्या सहकार्याने रोटरी ट्रस्ट बिल्डिंग, राजवाडानजीक या शिबिराचे आयोजन केले होते. क्लबचे अध्यक्ष साई हवालदार यांनी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले.
या शिबिरास सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, सावंतवाडी नगरपरिषद, सावंतवाडी रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, सार्वजनिक गणेश मंडळ चितारआळी, रक्तदाता संघटना अशा विविध संस्था व मान्यवरांनी सहकार्य दर्शविले, असे श्री. हवालदार यांनी सांगितले. यावेळी सचिव सुधीर नाईक व खजिनदार आनंद रासम, डॉ. विनया बाड, अनंत उचगावकर, अॅड. जायबा धुरी, सचिन देशमुख, सोमनाथ जिगजिन्नी, वसंत करंदीकर, सुहास सातोस्कर, श्रीराम गावडे, आबा कशाळीकर, प्रमोद भागवत, मिहीर मठकर, विहंग गोठोसकर, नेत्रतज्ज्ञ डॉ. इप्सा कुडवाडीया, व्यवस्थापक विनय भंडारी, तंत्रज्ज्ञ दीपाली, प्रिया, मनस्वी, तसेच पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्‍चंद्र पवार आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी ज्येष्ठ पत्रकार श्री. लोंढे, श्री. पवार यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा रोटरी क्लबतर्फे सन्मान करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64709 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top