ग्रामीण पर्यटन विकासाबाबत समुपदेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण पर्यटन विकासाबाबत समुपदेशन
ग्रामीण पर्यटन विकासाबाबत समुपदेशन

ग्रामीण पर्यटन विकासाबाबत समुपदेशन

sakal_logo
By

26617
वेंगुर्ले ः ग्रामीण पर्यटन विकास समुपदेशन सेमिनारमध्ये मार्गदर्शन करताना डॉ. धनश्री पाटील.

ग्रामीण पर्यटन विकासाबाबत समुपदेशन

वेंगुर्लेतील सेमिनार; ‘ईको टुरिझम’सह अन्य विषय चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ४ ः येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालय व केटीसी आणि स्पर्धा परीक्षा, नोकरी मार्गदर्शन कक्षाच्या संयुक्त विद्यमाने येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयात ‘ग्रामीण पर्यटन विकास समुपदेशन’ यावर सेमिनार घेण्यात आला.
‘कोकण ट्रॅव्हल क्लब’चे प्रतीक गावडे, वनस्पतीशास्त्र विभागाच्या डॉ. धनश्री पाटील, गावठी बाजार व देवशेतीचे संदीप राणे, स्पर्धा परीक्षा व नोकरी मार्गदर्शन कक्षाचे प्रा. नंदगिरीकर आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘कोकण ट्रॅव्हल क्लब’ ही भविष्यातील एक पर्यटन व्यवसाय कंपनी होण्याच्या दृष्टीने पदक्रमण करीत आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. कोकणात या व्यवसायासाठी परिपूर्ण व्यावसायिक तयार व्हावेत. तसेच अन्य प्रांतांतीत पर्यटन व्यवसायातील गोंधळ लक्षात घेता आपण कशाप्रकारे एक आदर्श पर्यटन जिल्ह्यात निर्माण करू शकतो आणि शाश्वत पर्यटनाला धक्का न लागता ‘ईको टुरिझम’ कसे विस्तारित करता येईल, याबाबत या सेमिनारमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, प्रा. डॉ. आनंद बांदेकर, प्रा. भेंडवडे, श्वेता हुले, ‘कोकण ट्रॅव्हल क्लब’चे नीलेश चेंदवणकर, यासीर मकानदार, विशाल खाजणेकर, प्रणव बागायतकर, सूर्यकांत गोळम आदी उपस्थित होते. या सेमिनारमध्ये आंबोली, दोडामार्ग, गोवा, मालवण, कणकवली, कुडाळ, विजयदुर्ग, मालवण, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथील बरेच जण सहभागी झाले होते. ऑगस्टपासून सहा महिन्यांसाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना इंटर्नशिप प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64718 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top