गाळ काढल्यास खेड पूरमुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाळ काढल्यास खेड पूरमुक्त
गाळ काढल्यास खेड पूरमुक्त

गाळ काढल्यास खेड पूरमुक्त

sakal_logo
By

पैसे चित्र वापरा
..
खेड पूरमुक्तीसाठी हवेत ११ कोटी!

जगबुडी अन्‌ उपनद्यांत गाळ; पावणेतेरा लाख घनमीटर गाळ काढल्यास खेड पूरमुक्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : जगबुडीसह उपनद्यांमधील गाळ काढल्यास नदी प्रवाह विनाअडथळा सुरळित होईल आणि खेड शहराचे पुरापासून संरक्षण होऊ शकते. त्यासाठी नदी, उपनद्यांसह खाडी पट्ट्यातील दहा ठिकाणचा सुमारे पावणे तेरा लाख घनमीटर गाळ काढणे आवश्यक आहे. याला १० कोटी ८० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी जिल्हा नियोजनमधून मिळावा, असा प्रस्ताव मे महिन्याच्या अखेरीस पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
जगबुडी व डुबी नदीला गतवर्षी जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर नदीजवळच्या बाधीत ग्रामपंचायतींनी खेड शहरवासीयांनी नदीपात्रातील गाळ काढण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर वाशिष्ठी नदीप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि खेड उपविभागिय अधिकारी यांनी गाळ काढण्यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या. जगबुडी, तिच्या उपनद्या डुबी, कुंभार्ली व चोरद नदी पात्रांची पाहणी करुन पाटबंधारेकडून गाळ काढण्याची ठिकाणे निश्‍चित केली आहेत. त्यानुसार दहा ठिकाणांवरील १२ लाख ८९ हजार ९०० घनमीटर गाळ काढणे आवश्यक आहे. नदीत साधारणपणे माती मिश्रित दगड-गोटे व काही ठिकाणी वाळू मिश्रित रोडा पात्रात भरलेला आहे. गाळ काढण्यासाठी अथवा जाहीर लिलावाद्वारे गाळ काढण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने करावी, असे अहवालात नमुद केले आहे. नदीपात्रातील गाळ हा अलोरे यांत्रिकी विभागाच्या सहकार्याने जिल्हा नियोजनच्या निधीतून काढला जावा, अशी मागणी केली आहे. वाशिष्ठीच्या धर्तीवर जगबुडी व नारंगी नदीतील गाळ यांत्रिकी विभागाकडून काढल्यास ८३. ७८ रुपये प्रति घनमीटरप्रमाणे १० कोटी ८० लाख ६७ हजार ८२२ रुपये खर्च येईल, असे पाटबंधारे विभागाच्या अहवालात आहे.
जगबुडी नदी, उपनद्या आणि खाडी परिसरातील १२ ठिकाणांवरील १२ लाख ८९ हजार ९०० घनमीटर गाळ काढणे आवश्यक आहे. त्यातील जगबुडी नदीपात्रातील कुडोशी ते भरणे बंधारा २ लाख १७ हजार ५००, भरणे ते नारंगी नदी संगमापर्यंत २ लाख ५० हजार, डुबी नदीपात्र खोपी ते मिर्ले ३ लाख ५० हजार, कुंभार्ली नदी ३० हजार, चोरद नदी संगम ते सुकिवली ब्रिज १५ हजार घन. मी. गाळ आहे. जगबुडी नदीच्या खाडी भागातील कोंडीवली बेटावर ३८ हजार ४०० घन. मी., निळिक बेटावर १ लाख ६० हजार, भोस्ते बेट ५२ हजार २०० घ. मी., भोस्ते खारी भाग १ लाख ५४ हजार घ. मी. क्षेत्रावरील गाळ काढणे आवश्यक आहे. हा गाळ खाडी भागातील असल्यामुळे मेरी टाईम बोर्डामार्फत कार्यवाही करता येऊ शकते.
---
कोट
जगबुडी नदीसह उपनद्यांमधील गाळ काढण्यासाठी येणाऱ्‍या खर्चाचा आराखडा तयार केला आहे. यासाठीचे सर्व्हेक्षण करुन तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
- ज. म. पाटील, पाटबंधार विभाग
..
एक नजर..
* स्थानिकांच्या मदतीने १२ गाळयुक्त ठिकाणे निश्‍चित
* गाळ काढल्यास खेड शहराचे पुरापासून संरक्षण
* निधीसाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव
..
ग्राफ करा
दृष्टिक्षेपात गाळ (घन. मी.) असा..
कुडोशी ते भरणे बंधाराः २ लाख १७ हजार ५००,
भरणे ते नारंगी नदी संगमापर्यंतः २ लाख ५० हजार
डुबी नदीपात्र खोपी ते मिर्लेः ३ लाख ५० हजार
कुंभार्ली नदीः ३० हजार
चोरद नदी संगम ते सुकिवली ब्रिजः १५ हजार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64740 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top