म्हाडाकडून अपंग कामगारांवर अन्याय - जयवंत विचारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाकडून अपंग कामगारांवर अन्याय - जयवंत विचारे
म्हाडाकडून अपंग कामगारांवर अन्याय - जयवंत विचारे

म्हाडाकडून अपंग कामगारांवर अन्याय - जयवंत विचारे

sakal_logo
By

म्हाडाकडून अपंग कामगारांवर अन्याय
भांडुप येथील अंपग कामगार जयवंत विचारे; न्यायालयात दाद मागणार
संगमेश्वर, ता. ४ः मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने अपंग कामगारांसाठी स्वस्त घरकुलाची घोषणा केली होती. आता मात्र अपंग अथवा अंध लोकांना असा कोणताही राखीव कोटा नसल्याचे आमदार रमेश कोरगावकर आणि आमदार शेखर निकम यांना लेखी कळवण्यात आले आहे. या विरोधात लवकरच न्यायालयात दाद मागणार असल्याचे भांडुप येथील अपंग कामगार जयवंत विचारे यांनी सांगितले आहे.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा घटक ) यांनी काही वर्षा पुर्वी गिरणी कामगारांसाठी स्वस्त घरकुलाची घोषणा केली होती, या मधे जवळपास 58 गिरण्यामधील लाखो कामगारांचा समावेश केला होता, त्या वेळी मुंबई गृहनिर्माण विभागाने कामगारांसाठी माहिती पुस्तिका आणि छापील मागणी अर्ज लाभार्थीना मोफत पुरवले होते. त्यामध्ये पुस्तकातील पुष्ठ क्रमांक 4 वरील कॉलम 16 मधे अर्जदार शारीरिकदृष्टया अपंग अथवा अंध असल्यास अर्जात तसे नमुद करावे असे स्पष्ट दिलेले असताना आता मात्र म्हाडाने गिरणी कामगारासाठी गृह निर्माण विभागाने स्वस्त, हक्काची घरकुले देण्याचा संकल्प केला होता, त्याप्रमाणे काही हजारो घरांची लॉटरी काढण्यात आली, मात्र म्हाडाने माहिती पुस्तकात व मांगणी अर्जात जाहीर केल्याप्रमाणे अद्याप एकही घर अपंग अथवा अंधासाठी सोडलेले नाही. या विषयी बॉम्बेडाईंग मिलचे अपंग कामगार (सध्या भांडुप येथील रहिवाशी ) जयवंत विचारे यांनी याबाबत गृह निर्माण (म्हाडा )विभागाकडे विचारणा केली होती, यावर गृहनिर्माण विभागा कडुन समर्पक उत्तर न मिळाल्याने त्यांनी संगमेश्वर चिपळूणचे आमदार, शेखर निकम आणि भांडुप टेम्बीपाडा विभागचे आमदार रमेश कोरगावकर यांना निवेदनाद्वारे साकडे घातले होते, या दोन्ही आमदारांनी गृहनिर्माण विभागाकडे पत्रव्यहार करून गृहनिर्माण विभागाचे लक्ष वेधले होते, त्या वेळी गृहनिर्माण विभागाचे उपमुख्य अधिकारी पी, बी, राठोड यांनी अपंग अथवा अंधासाठी असा कोणताही राखीव कोटा ठेवला नसल्याचे लेखी कळवले आहे.

कोट
गृहनिर्माण विभागाने आम्हा अपंग गिरणी कामगारांना घर कुळाचे स्वप्न दाखवले. पण आता त्यांनी कानावर हात घेऊन आम्हा अपंगांना वाऱ्यावर सोडले आहे. या विषयी आपण लवकरच न्यायालयात दाद मागणार आहोत.
- जयवंत विचारे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64926 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top