
गणितोत्सवः प्रेरणादायी उपक्रम गणितोत्सवः प्रेरणादायी उपक्रम
rat५p४.jpg
26783
डॉ. गजानन पाटील.
(शिक्षण लोकल टू ग्लोबल...............लोगो)
इंट्रो
भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर हा जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन शाळांमध्ये करण्यात येते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार प्राथमिक स्तरावर प्रत्येक विद्यार्थ्याने मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय व राज्यपातळीवर निपुण भारत अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व प्रारंभिक संख्याज्ञान (FLN) विकसित व्हावे याकरिता उपक्रम राबवण्यात येत आहेत. निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सवाचे आयोजन २० ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये केले होते.
- डॉ . गजानन पाटील
----------------------------------------------
गणितोत्सवः प्रेरणादायी उपक्रम
रत्नागिरी जिल्ह्यात डाएटच्या मार्गदर्शनाखाली या गणितोत्सवाचे आयोजन सर्व शाळांमध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये ४६७ शिक्षक, १०, ९२० विद्यार्थी, ३८४ एसएमसी सदस्य आणि ६८३ पालक यांनी सहभाग घेतला होता. या गणितोत्सवाची प्रमुख संकल्पना पायाभूत संख्याज्ञान (FLN Foundational Numeracy)ही होती. पायाभूत संख्याज्ञान म्हणजे साध्या संख्यात्मक संकल्पना आणि त्यांच्यातील कार्यकारणभाव समजून घेऊन त्यांचा दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वापर करणे. गणनपूर्व संकल्पना, संख्यांची संकल्पना तसेच तुलना करणे, क्रमवार लावणे, वर्गीकरण करणे, आकृतिबंध ओळखणे यांचे ज्ञान शाळापूर्व काळात होणे महत्वाचे आहे. पूर्व प्राथमिक वर्गात मूलभूत गणित शास्त्राचा पाया पक्का होण्यासाठी वरील बाबी महत्त्वाच्या आहेत.
या तीन दिवस चाललेल्या गणितोत्सवाअंतर्गत शाळा शाळांमध्ये गणित परिपाठ, गणित तज्ञांच्या रंजक गोष्टी, सुचवलेल्या गणितविषयक कृती ,पारंपरिक गोष्टीतील गणित, परिसरातील गणित, गणिती कोडी, कूटप्रश्न, गणितविषयक गाणी, बडबड गीते, गणितीय रांगोळी, चित्रकला स्पर्धा, आकार, आकृतिबंध, गणिततज्ञांचे रेखाचित्र व व्यक्तिचित्र (रांगोळी) व इतर सर्जनशील, गणित प्रश्नमंजुषा, गणितजत्रा, गणित मेळावा, शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन, शिक्षकनिर्मित साहित्य, विद्यार्थीनिर्मित साहित्य, गणितपेटीतील साहित्य असे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना गणितीय संबोध तसेच गणिताची गोडी विकसित व्हावी याकरिता चालना देण्यासाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)संकल्पनेवर आधारित सर्जनशील व नावीन्यपूर्ण पोस्टर निर्मितीसुद्धा करण्यात आली. राज्यातील शिक्षक, अधिकारी, गणितप्रेमी व शिक्षणतज्ञ यांनी पोस्टर निर्मिती उपक्रमांतर्गत सक्रिय सहभाग घेतला. या गणित्सोवामध्ये शाळां शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, एसएमसी सदस्य, गावातील तरुण-तरुणी यांनी सहभाग घेतला. सन २०२६-२७ मध्ये तयार होणारा विद्यार्थी हा गणित विषयामध्ये प्रवीण करण्यासाठी उपयुक्त ठरणारा गणितोत्सव निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. या द्वारे विद्यार्थ्याचे पायाभूत साक्षरता व प्रारंभिक संख्याज्ञान (FLN)विकसित तर होणारच आहे शिवाय या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजनसारखा एखादा गणिततज्ञ तयार होईल. पालकांना या उपक्रमाच्या माध्यमातून एक नवी दृष्टी निर्माण होईल, असा हा प्रेरणादायी गणितोत्सव येत्या शैक्षणिक वर्षात १०० टक्के शाळांमध्ये राबवला जाईल.
(लेखक प्रयोगशिल शिक्षण, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून, स्तंभलेखक आहेत.)
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64927 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..