
मातोंड हायस्कूलच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन
L26792
- मातोंड ः हायस्कूलच्या प्रवेशद्वाराचे फीत कापून उद्घाटन करताना दादा म्हालटकर. सोबत इतर मान्यवर.
मातोंड हायस्कूलच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन
माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार ः फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ ः तालुक्यातील मातोंड येथील न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या सर्वोत्कर्ष एकता फाउंडेशनतर्फे हायस्कूलचे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी हायस्कूलचे माजी शिक्षक, संस्था प्रतिनिधी व गुणवंत विद्यार्थ्यांचा फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. मातोंड ग्रामस्थ सत्कार्योत्तेजक संस्था, मुंबई व रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड हायस्कूलच्या सुसज्ज अशा नवीन प्रवेशद्वाराचे उद्घाटन व सन्मान सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला. मातोंडचे माजी सरपंच उदय परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तर मातोंड ग्रामस्थ सत्कार्योत्तेजक संस्थेचे सदस्य दादा परब-म्हालटकर यांच्या हस्ते फीत कापून उद्धाटन केले.
यावेळी निवृत्त केंद्रप्रमुख रावजी परब, तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, पंचायत समिती माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, निवृत्त मुख्याध्यापक एम. जी. मातोंडकर, उपसरपंच सुश्मिता परब, मुख्याध्यापक श्री. मांजलकर, संस्थेचे सदस्य कृष्णा परब व सुभाष परब, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव कोंडये, महानंदा घाडी, सुवर्णलता जबडे, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी तालुका सचिव बाबली गवंडे, सकल मराठा समाजाचे वसई तालुकाध्यक्ष विश्वास सावंत, निवृत्त वायरमन कृष्णा घाडी यांच्यासहित माजी शिक्षक, सर्वोत्कर्ष एकता फाउंडेशनचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी, हायस्कूलचे शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी आयोजित सन्मान सोहळ्यात हायस्कूलचे माजी शिक्षक एन. ए. पाटील, व्ही. बी. पाटील, श्री. पवार, श्री. जाधव, श्री. वनसाळे, श्री. मांजरेकर, रावजी परब, संस्थेचे सदस्य दादा म्हालटकर, कृष्णा परब व सुभाष परब, रक्तमित्र प्रतिष्ठानचे बाबली गवंडे, विश्वास सावंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर २०२०-२१ च्या दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त राज परब, द्वितीय गौरेश परब व राज मातोंडकर, तृतीय दीपक परब, पाचवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी दीक्षिता मातोंडकर, इंस्पायर अवॉर्डधारक विद्यार्थिनी स्नेहा जाधव, एनएमएमएस परीक्षेत मराठा गटातून शिष्यवृत्तीधारक रुची मोहिते यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन पत्रकार दीपेश परब, तर प्रास्ताविक माजी विद्यार्थी रमेश गावडे यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64939 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..