
नारळ बागायतदारांचा हातिस येथे मेळावा
नारळ बागायतदारांचा हातिस येथे मेळावा
रत्नागिरीः देशाच्या स्वातंत्र्याचा आणि हातिस येथील कल्पवृक्षाच्या लागवडीचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने रविवारी (ता. २२) मे रोजी हातिस येथे हातिस ग्रामविकास मंडळ, हातिस आणि मुंबई आणि जिल्हा परिषद यांच्यावतीने नारळ बागायतदार मेळावा पार पडला. या कार्यक्रमास कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी सभापती कुमार शेटये, मरिनर कॅ. दिलीप भाटकर, पंचायत समिती माजी सदस्य महेंद्र झापडेकर, टेंभ्ये-हातिस ग्रामपंचायतीच्या सरपंच कांचन नागवेकर, हातिस ग्रामविकास मंडळ अध्यक्ष दिवाकर नागवेकर आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष शंतनू नागवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
---------------------------
‘हिंद मराठा’ सरचिटणीसपदी चाळके
खेड, ता. ः हिंद मराठा महासंघ राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी जिल्हा सरचिटणीस पदी अंकुश चाळके यांची निवड जाहीर केली. अंकुश चाळके हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात समाजात सक्रिय सहभागी आहेत. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते समाजात प्रसिद्ध आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी आपलेसे करून मराठा बांधवांसाठी सतत काहीतरी चांगलं करण्याची त्यांची धडपड पाहून हिंद मराठा महासंघाने त्यांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यांची निवड जाहीर होताच विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे. राज्य उपाध्यक्ष अनिल बुवा जाधव, कोकण प्रदेशाध्यक्ष निवृत सहाय्यक पोलिस आयुक्त विनोदराव चव्हाण, कोकण महिला प्रदेशाध्यक्षा ज्योती भोसले, मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय सावंत, रत्नागिरी जिल्हा महिलाध्यक्षा ऐश्वर्या घोसाळकर, दापोली महिलाध्यक्षा संजना सावंत आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
----------------
आगोटीच्या खरेदीत सुकी मासळी
खेडः असह्य उकाड्यामुळे खेड शहरामध्ये नागरिक बाजार खरेदी करताना हैराण झाले आहे. सध्या आगोटीची खरेदी सुरू आहे. खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून सध्या सुकी मासळी जीवनावश्यक वस्तूबरोबर प्लास्टिक खरेदी मोठ्या प्रमाणात करतानाही दिसून येत आहे. खेड शहरांमध्ये अनेक ठिकाणी बेजबाबदार गाड्या उभ्या केल्या जात असल्याने वर्दळीच्या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेला खरेदी करताना अडचण निर्माण होत आहे. या बाबीकडे वेळोवेळी आवाज उठवला जात असताना प्रशासन याकडे कोणतीच लक्ष देण्यास सवड नसल्याचे दिसून येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y64961 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..