फोटो व्हायरलप्रकरणी तरुणास पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो व्हायरलप्रकरणी तरुणास पोलिस कोठडी
फोटो व्हायरलप्रकरणी तरुणास पोलिस कोठडी

फोटो व्हायरलप्रकरणी तरुणास पोलिस कोठडी

sakal_logo
By

फोटो व्हायरलप्रकरणी
तरुणास पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ५ ः तालुक्यातील एका युवतीचा फोटो अश्‍लील पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी भोसरी-पुणे येथील एका तरुणाला येथील पोलिसांनी अटक केली. आज त्याला कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संबंधित युवतीने येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी संशयिताविरोधात विनयभंग व फोटो एडिटप्रकरणी आयटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण व त्यांच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने भोसरी-पुणे येथून एका २२ वर्षीय संशयित तरुणाला ताब्यात घेतले. संशयित एका कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला पोलिस ठाण्यात आणून चौकशीअंती अटक करण्यात आली. आज त्याला कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता ७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलिस कर्मचारी सुहास पांचाळ, दिलीप खोत, अजय येरम यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65042 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top