दाभोळ ः दापोलीत सायकल फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः दापोलीत सायकल फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद
दाभोळ ः दापोलीत सायकल फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद

दाभोळ ः दापोलीत सायकल फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद

sakal_logo
By

-rat5p35.jpg
L26882
दापोली ः सायकलफेरीत सहभागी झालेले दापोलीकर.
...
दापोलीत सायकल फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ५ ः सायकलचं महत्त्व व आरोग्यदायी फायदे समजून सांगण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आज सायकलफेरी काढण्यात आली. ही फेरी झाल्यावर आझाद मैदानावर स्लो सायकल स्पर्धेचेही आयोजन केले होते. दरवर्षी ३ जून हा जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली-आंबेडकर चौक-कोकंबा आळी-श्री भैरीभवानी मंदिर गिम्हवणे-सोनारवाडी- तेलीवाडी- एकतानगर- टांगर गल्ली-बुरोंडीनाका-आझाद मैदान असा ६ किलोमीटरचा होता. यामध्ये सर्व वयोगटांतील नागरिक सहभागी झाले होते. दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्य सायकल फेरीचे आयोजन केले जाते. या फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, अंबरिश गुरव, विनय गोलांबडे, राहुल मंडलिक, झाहीद दादरकर, अमोद बुटाला, राकेश झगडे, रागिणी रिसबूड, शैलेश मोरे, उत्पल वराडकर आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा, असे आवाहनही आयोजकांनी केले.
--------------------
चौकट
सायकल स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
सायकल फेरी झाल्यावर आझाद मैदानात स्लो सायकल स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. तीमध्ये मुलगे मोठ्या गटात सर्वेश बागकर, आयुष शिर्के, वेदांत नाचरे यांनी, मुली मोठ्या गटात अनिषा लयाळ, मनश्री पालवणकर, रिद्धिमा चव्हाण यांनी यश मिळविले. लहान गटात संघरत्न शेळके, अनुज शिगवण, हेरंब लोंढे, ग्रीष्मा चव्हाण विजेते ठरले. त्यांना चषक, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. भेटवस्तू म्हणून सायकल हेल्मेट, हवा भरण्याचा पंप आदी सायकलिंगसाठी उपयोगी साहित्य देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65047 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top